युती चा धर्म न पाळणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 11, 2019

युती चा धर्म न पाळणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

युती चा धर्म न पाळणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

सोलापूर विमानतळावर शेटफळच्या डोंगरेंचा उपद्व्याप मुख्यमंत्र्यांच्या कानावर




मोहोळ प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघाची महायुतीचे उमेदवारी शिवसेना व भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नागनाथ क्षीरसागर यांना संपूर्ण विचारांती दिली.असे असताना गेल्या वर्षभरापूर्वी भाजपमध्ये आलेल्या जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी युतीचा धर्म न पाळता शिवसेनेकडून उमेदवारी न मिळालेल्या अपक्ष उमेदवार मनोज भाई शेजवाल यांचा प्रचार सुरू केला. केवळ प्रचारच न करता आम्हाला भाजपच्या वरिष्ठ श्रेष्ठींचा तसा आदेश आहे अशी अफवा पसरवून युतीच्या मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम डोंगरे यांनी केले आहे. ही बाब नगरसेवक तथा मोहोळ विधानसभेचे अधिकृत उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सुशील क्षीरसागर यांनी राज्याचे सहकार तथा पणन मंत्री सुभाष बापू देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख हे परजिल्ह्यात प्रचारासाठी असल्याने त्यांनीही ही बाब भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भ्रमणध्वनीवरून कळविली. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार यांनी मोहोळ मतदारसंघातील ही महत्त्वाची राजकीय घडामोड गांभीर्याने घेत सोलापूर विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुशील क्षीरसागर यांची भेट घालून देत सदर महत्त्वाच्या राजकीय बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे  लक्ष वेधले. महायुतीच्या तत्त्वाला छेद देऊन पक्षाविरोधात काम करून पक्षाची बदनामी करत असल्याची बाब क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या   निदर्शनास आणून दिली.त्यामुळे त्यांना याबद्दलचा जाब पक्षश्रेष्ठींनी विचारावा आणि याबाबत पक्षांतर्गत चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी कैफियत वजा मागणी महायुतीचे अधिकृत उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव सुशील  क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचाराच्या दौऱ्यावर आले असताना सोलापूर येथील विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सुशील क्षीरसागर यांनी मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार हे देखील उपस्थित होते. मोहोळ विधानसभा मतदारसंघात युती विरोधात कोण कोण अफवा पसरवून अपप्रचार करत आहेत याबद्दलची सर्व माहीती गांभिर्याने ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केवळ मोहोळच नाही तर राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना असो अथवा भाजप असो दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व जबाबदार नेतेमंडळींनी युतीचा धर्म पाळत एकमेकाच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करणे गरजेचे आहे. जर मोहोळ विधानसभा मतदारसंघात भाजपची कोणी पदाधिकारी जर अशी वेगळी अफवा पसरवून शिवसेना आणि भाजपच्या महायुतीमध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर त्वरित पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून चौकशी करून कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. सदर राजजकीय घडामोडीची सविस्तर माहिती जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार यांनी घेऊन त्वरित पक्षाला अहवाल पाठवावा व पक्षाविरोधात काम करणार्‍यावर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना ही यावेळी ना. देवेंद्र फडणीस यांनी जिल्हाध्यक्ष शहाजी भाऊ पवार यांना दिल्या. नागनाथ क्षीरसागर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असून त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी शिवसेना व भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने कामास लागावे असे आवाहनही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

महायुतीच्या उमेद्वाराचा एकदिलाने प्रचार करा - शहाजीभाऊ पवार भाजप जिल्हाध्यक्ष 
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात भजप आणि शिवसेनेची अन्य मित्र पक्षांशी महायुती असून दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या विचारविनियमा द्वारे महायुतीच्या उमेदवारीचे वाटप झाले आहे. मोहोळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जरी आला असला तरी तेथील महायुतीचा उमेदवार विजयी करणे ही आमच्या भाजप पक्षाची ही तितकीच जबाबदारी आहे. जर कोणी अपक्ष उमेदवाराचा प्रचार करुन आम्हास भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी संबंधितांना विजयी करा असे सांगितले आहे असा संदेश अप्रत्यक्ष देण्याचा प्रयत्न करत असेल तर याची चौकशी करून आम्ही संबंधिताची पक्षातून त्वरित हकालपट्टी करणार आहोत. मोहोळ तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी एक दिलाने महायुतीचे उमेदवार नगनाथ क्षीरसागर यांचा प्रचार करून त्यांना विजयी करून राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages