पदयात्रा व सभेत सुभाष देशमुखांना बहुमताने निवडणून आणण्याचा संकल्प
दक्षिण सोलापूर विधानसभा भाजप महायुतीचे उमेदवार मा. श्री. सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर, प्रभाग क्र १९ मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आकाशवाणी केंद्र येथून पदयात्रेला सुरुवात करून जगदंबा नगर - ज्योती नगर-सिद्धेश्वर नगर-चैतन नगर- सागर नगर-कुमारस्वामी नगर-निलम नगर भाग १ ते ५- - इंगळे वस्ती- आडम प्लॉट- जमादार वस्ती-निवारा नगर येथून विनायक नगर येथे समारोप करण्यात आले. यावेळी भाजप युवा नेता रोहन देशमुख यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाली.प्रसंगी सभागृह नेते श्रीनिवास (अण्णा) करली, नगरसेविका वरलक्ष्मी श्रीनिवास पूरुड, अनिता व्यंकटेश कोंडी, भाजप नेते सोमनाथ केंगनाळकर, सरचिटणीस शशी थोरात, परिवन सदस्य नागनाथ शिवसिंगवाले, अशोक बोयणाल, शिवशरण बब्बे, विठ्ठल दावत, नरेश सिरसाल, गंगाराम पातुर, तुकाराम काळे, गोपी कोंगारी, तुकाराम मधणे, हरीष पूरुड, अविनाश बिराजदार, श्रीकांत लोला, दत्ता गवाने आदी कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment