कायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा निवडणूक आयोगाने घेतला आढावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 11, 2019

कायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा निवडणूक आयोगाने घेतला आढावा

कायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा
निवडणूक आयोगाने घेतला आढावा

पुणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी आज पुणे विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
            यशदा येथे पुणे विभागातील पुण्यासह सोलापूरसातारा कोल्हापूर आणि  सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमारअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदेविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते.
श्री सिन्हा म्हणालेमतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. दिव्यांग मतदारज्येष्ठ नागरिकमहिला यांचीही विशेष काळजी घेतली जावी. मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहेमतदार यादीतील क्रमांक याची माहिती वेळेपूर्वी मिळेलयाची दक्षता घेतली जावीमतदारांना मतदार चिठ्ठया वेळेपूर्वी उपलब्ध करून दिल्या जाव्यात,
असे सांगून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेतअसे सांगितले.  निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना मतदान करता यावेयासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी. आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्थिर संनिरीक्षण पथकेभरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात यावा. मतदानाचे प्रमाण वाढावेयासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages