
मतदार यादीबाबतच्या तक्रारी 1950 या क्रमांकावर करण्याचे आवाहन
सोलापूर, दि. 11 : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मतदार यादीबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असतील तर त्या तक्रारी निवडणूक विभागाने उपलब्ध केलेल्या 1950 या क्रमांकावर कराव्यात. हा क्रमांक 24 तास मतदारांच्या सोईसाठी उपलब्ध असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी दिली आहे.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 21 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून त्यानूसार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. तरी कोणत्याही विधानसभा मतदार संघातील मतदाराला मतदान केंद्र, मतदार यादीतील नाव आहे की नाही तसेच या अनुषंगाने इतर कोणत्याही तक्रारी असतील अथवा माहिती हवी असेल तर उपलब्ध करुन दिलेल्या 1950 या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन श्रीमती भोसले यांनी केले.
तसेच निवडणूक कामकाजाविषयी नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी असतील तर 18002338950 या हेल्पलाईनवर कराव्यात, असेही कळविण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment