मोहोळ(प्रतिनिधी) मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे ह्या मतदारसंघात असणाऱ्या दीडशे गावामधून राष्ट्रवादी काँग्रेसला भूमिपुत्र उमेदवार मिळाला नाही त्यामुळे त्यांनी इंदापूर येथील उमेदवार आयात केला याचाच अर्थ आपल्या भागातील दीडशे गावात एक लायक उमेदवार त्यांना मिळाला नाही याचा मतदारांनी विचार करावा असे मत शंकरराव वाघमा
रे यांनी व्यक्त केले.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने
निवडणूक प्रचार सभेच्या दरम्यान नजिक पिंपरी, ढोकबाभूळगांव, कातेवाडी, कामती खुर्द, लमाणतांडा, तरटगाव, शिंगोली, पिरटाकळी, शिरापूर, परमेश्वर पिंपरी या गावांमध्ये सभेच्या दरम्यान ते बोलत होते.
या प्रचारसभेच्या दौऱ्यात शिवसेनेचे मोहोळ तालुका संघटक काकासाहेब देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, भाजपा नेते संजय क्षीरसागर, माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे, नगरसेविका सीमा पाटील, बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख अशोक भोसले, भाजपाच्या महिला तालुका अध्यक्षा अंजली काटकर, बंडू नाना गायकवाड, युवा सेनेचे राजरत्न गायकवाड, सीताराम मासाळ, सोमनाथ मासाळ, युवराज चौगुले, संतोष चौगुले, दत्तात्रय माने, तानाजी माने, विशाल मासाळ, श्रीधर काळे, आबा मासाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना वाघमारे यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार मनोज शेजवाल यांचे नाव न घेता त्यांच्यावर
सडकून टीका केली ते म्हणाले की गेल्या वेळेस शिवसेना आणि भाजपाची युती झाली नव्हती
आशा परिस्थितीत शिवसेनेकडून मनोज शेजवाल यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी देखील अनेकजण इच्छुक होते मात्र त्यावेळी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिकांनी माघार घेतली व आपापल्या पक्षाचे प्रामाणिक काम केले मात्र यावेळी शिवसेनेशी गद्दारी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुपारी घेऊन शेजवाल यांनी अपक्ष फॉर्म भरून शिवसेना महायुती मध्ये मीठाचा खडा टाकण्याचे महापाप केले आहे मात्र आपल्याकडील मतदार सुजाण आहेत ते आपल्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या नागनाथ क्षीरसागर यांना निवडून देतील असा विश्वास वाटत असल्याचे शेवटी वाघमारे म्हणाले.
यावेळी दादासाहेब पवार, भागवत मुळे, पाटील गुरुजी, अरुण तांबीले, श्रीधर चव्हाण, रमेश गायकवाड़, ग्रामपंचायत सदस्य भारत बरकड़े, उपसरपंच संगीता आठवले, शिवाजी पासले, शाखा प्रमुख मारुती मुळे, पप्पू चौधरी, अण्णा मस्के, सुरेश मुळे, रवी पवार, सुहास राठोड, गोरख पवार, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment