*राजकारण* करायचे असल्यास *युवा नेते* बनण्यापूर्वी निदान *स्वतःच्या दोन वेळच्या भाकरीची तजवीज करून ठेवा...*
*व्याजाने* पैसे आणून कितीही मोठ मोठाले *होर्डिंग्ज* लावले तरी *घरी कुणीही धान्य आणून देत नसतं...*
*तुमची उपयुक्तता संपली* की तुम्हाला तुमचे *आदर्श नेते खरूज लागलेल्या कुत्र्याप्रमाणे फाटकाबाहेर हाकलून देतील...*
तुम्ही *हातात* मोठ्या *अभिमानाने मिरविलेले पिवळे , भगवे , निळे आणि हिरवे झेंडे तुमच्या अवस्थेवर खो खो हसतील...*
*नोकरी किंवा व्यवसाय* नसलेल्या *तरुणांचा भविष्यकाळ अत्यंत बिकट असणार आहे...*
जे लोक तुम्हाला *करियर डेव्हलपमेंटच्या* गोष्टी सांगतात , ते स्वतःच कुणाची तरी *भाड खाऊन कुटुंबनिर्वाह करतात...*
कुणी आपला *स्वाभिमान* विकलेला आहे, कुणी *कळलाव्या* नारदाची भूमिका बजावत आहे,
अशा *वाममार्गानेच* तुमचे *आवडते नेते* पैशांनी *गब्बर* झालेले आहेत व येथून पुढे *राजकारण हे त्यांच्याच अवती भवतीच फिरणार आहे...*
*पक्ष, पक्ष- संस्कार, पक्षाची विचारधारा* या निव्वळ पोकळ गप्पा असून *या भाकडकथा तुमच्या माझ्यासारख्या तरुणांना फुकटात राबवून घेण्यासाठीच रचलेल्या आहेत...*
जेवढा *वेळ* आपण *नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवितो,* तेवढ्या वेळात एखाद्या *कपड्याच्या* दुकानात काम करून महिन्याकाठी ५ ते १० हजार रुपये कमवून आपण आपल्या *आई वडिलांच्या हाती देऊ शकत असू,* तर या जगात *आपल्यापेक्षा मोठा विकासपुरुष अन्य कुणीही असू शकत नाही...*
आपल्या *एकामुळे* जगाचे काहीही *बरे-वाईट* होत नाही. आपण *स्वतःचा विकास* केल्यास *राष्ट्राचा विकास* आपोआप होतो. *५० लाखांच्या* गाडीत हिंडणाऱ्या व्यक्तीस *गरीबाशी, बेरोजगाराशी काहीही देण घेण नसतं,* तो फक्त आपला *स्वार्थ* जपत असतो. त्यामुळे आपली *घरची परिस्थिती* बेताची असल्यास *नेत्यांच्या अजिबात मागे लागू नका...*
आपल्याला पुढे *आर्थिक चणचण, शुगर, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, राजकारणाच्या नादी लागून फुकटचे विकत घेतलेले शत्रुत्व व बेरोजगारी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे,* जेव्हा *तुमचे* आवडते *नेते तुम्हाला १ रुपयाची सुद्धा मदत करणार नाही...*
तुमचं *तारुण्य* निघून गेल्यावर कुणीही तुम्हाला *दारू पाजणार नाही* किंवा *मटन खाऊ घालणार नाही,* कारण तुमचा *उपयोग संपल्यावर* अन्य कुणी तरी दुसरा *मूर्ख तरुण* रिक्रुटमेंटसाठी कायम *नेत्यांपुढे* तयार असेलच . मग *चोरी, गुन्हेगारी किंवा आत्महत्या* या तीन *पर्यायांखेरीज अन्य कुठचाही पर्याय तुमच्याजवळ शिल्लक नसेल...*
*स्वतःला सावरून आयुष्य संपन्न बनविण्याचे हेच वय असते.* हे वय *नेत्यांच्या मागे धावण्यात वाया घालवू नका...!*
2020 जवळ येतोय म्हणून हि माहिती युवक मित्रांनी लक्षात घायची आहे
*दिल पे लगेगी तभी तो बात बनेगी।*
*आईबापाला घोटभर पाणी न देणारं पोरगं* !!
*नेत्याच्या वाढदिवसाला बाटलीभर रक्त देवून येतं !
*कुठं चाललाय समाज..?*
0 Comments