Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा,माळशिरस व करमाळा मतदारसंघ घटक पक्षांना देण्याची आग्रही मागणी


    माढा,माळशिरस व करमाळा  मतदारसंघ घटक पक्षांना देण्याची आग्रही मागणी            
   टेंभुर्णी (प्रतिनिधी)- माढा माळशिरस व करमाळा हे तीन विधानसभा मतदारसंघ महायुतिकडुन घटक पक्षांना मिळावेत याची मागणी घटक पक्षांच्या बैठकीमध्ये करण्यात आली.टेंभुर्णी येथे महायुतीतील घटक पक्षांची बैठक घेण्यात आली.या बैठकीचे आयोजन राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्स प्रा सुहास पाटील यांनी केले. ही बैठक रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील, रिपाईंचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे,रासपचे पश्चीम महाराष्ट्र राज्यसंघक माऊली सलगर,शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष  सुधीर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.यावेळी रयत क्रांती संघटना,आरपीआय,रासप व शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी ऊपस्थित होते.बैठकीमध्ये विचारविनीमय होऊन ठराव मंजुर करण्यात आले.माढा विधानसभा मतदारसंघामध्ये राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्स प्रा सुहास पाटील व माळशिरस मतदार संघामध्ये महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना प्रामुख्याने ऊमेदवारी मिळावी असा ठराव मंजुर करण्यात आला
.करमाळा सांगोला व अक्कलकोट या जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाव्यात हा ठरावही करण्यात आला.यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे म्हणाले,सर्व घटकपक्षांच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वात घेऊन महायुतीने ऊमेदवार निवडावेत.गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीने घटक पक्षांना विश्वासात घेतले नाही परंतु वरिष्ठांच्या आदेशामुळे आम्ही महायुतीच्या ऊमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले.महायुतीचा ऊमेदवार निवडून आणण्यात घटक पक्षांचे मोठे योगदान आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments