विजयदादांच्या मध्यस्थीने हर्षवर्धन पाटील 'हाता'त घेणार 'कमळ'... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 4, 2019

विजयदादांच्या मध्यस्थीने हर्षवर्धन पाटील 'हाता'त घेणार 'कमळ'...

विजयदादा व हर्षवर्धन पाटलांची राजकीय खलबते 
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसणार आहे.  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनी आज बुधवार दि. ४ रोजी अकलूज येथे जाऊन विजयदादा यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये बंद खोलीत तासभर चर्चा झाली. त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते. त्यानंतर आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले. श्री विजयसिंह मोहिते -पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीला मोठे राजकीय धक्के मिळत आहेत. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेते हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटलांची राजकीय खेळी यशस्वी ठरत आहे...
हर्षवर्धन पाटलांनी भाज्यांमध्ये जाण्यासाठी आज आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages