गुलाबराव देवकर सुरेश जैन यांच्यासह ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे ; घरकुल घोटाळा . - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 31, 2019

गुलाबराव देवकर सुरेश जैन यांच्यासह ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे ; घरकुल घोटाळा .

घरकुल घोटाळा ; गुलाबराव देवकर सुरेश जैन यांच्यासह सर्व आरोपी दोषी 
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने माजी मंत्री, शिवसेना नेते सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वच आरोपींना दोषी ठरवले आहे

काय आहे घरकुल घोटाळा ?

घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरं देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले.  हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली. २००१ मध्ये या योजनेतला घोळ समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवहार हे सगळे प्रकार उघडकीस आले. पालिकेने ज्या जागेवर घरकुलं बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. या योजनेसाठी बिगरशेती परवानगी घेण्यात आली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतल्या बिल्डर्सना हे काम दिले. ठेकेदारांना २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले होते. निविदेमधील काम वेळेत पूर्ण करण्याची मर्यादा ठेकेदाराने पाळली नाही.ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून देण्यात आली.दरम्यान याच काळात जळगाव नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाले.  या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी यांच्यासह एकूण ९० जणांचा समावेश आहे. यापैकी सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह एकूण ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages