Hot Posts

6/recent/ticker-posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला भीम आर्मीचा विरोध

सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या १ सप्टेंबर रोजी  सोलापुरात येत आहेत.शहांच्या या सभेला भीम आर्मीचा तीव्र विरोध आहे.  भीम आर्मीने अमित शहांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. . दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथील चुनाभट्टी परिसरात सोनाली शिंदे या दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आणि उपचारादरम्यान त्यातच तिचा मृत्यू झाला. त्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असा आरोप भीम आर्मीने केला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments