भारत आणि पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय; मोदींनी केले स्पष्ट. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 26, 2019

भारत आणि पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय; मोदींनी केले स्पष्ट.

भारत आणि पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय; मोदींनी केले स्पष्ट



1)जी ७ परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
2)भारत आणि पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय - पंतप्रधान मोदींनी केले स्पष्ट
3)काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्ण नियंत्रणात असल्याचेही मोदींनी सांगितले
4)ट्रम्प यांनीही मोदींच्या भूमिकेचं समर्थन केलं
जी ७ परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले की भारत आणि पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय आहेत आणि कोणत्याही देशाला यासाठी कष्ट घेण्याची आवश्यकता नाही.
 काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्ण नियंत्रणात आहे. ट्रम्प यांनीही मोदींच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यांना मोदींवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं.
मोदी म्हणाले, 'भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान अनेक द्विपक्षीय मुद्दे आहेत. पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानांना मी फोन करून शुभेच्छा देताना सांगितले होते की पाकिस्तानला आरोग्य, गरीबी, शिक्षणाचा अभाव अशा मुद्द्यांवर लढायला हवं.
 दोन्ही देश मिळून याविरोधात लढूया. दोन्ही देश जनतेच्या भलाईसाठी काम करतील.'

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages