मी राजीनामा देणार नाही, मार्क झुकरबर्गचं स्पष्टीकरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 10, 2018

मी राजीनामा देणार नाही, मार्क झुकरबर्गचं स्पष्टीकरण

मी राजीनामा देणार नाही, मार्क झुकरबर्गचं स्पष्टीकरण
वॉशिंग्टन : डेटा लीकप्रकरणी आपण राजीनामा देणार नसल्याचं, फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे. तसेच भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेतल्या निवडणुकीत डेटा चोरी प्रकरणाच्या तपासासाठी समिती स्थापन केल्याची घोषणाही केली आहे.झुकरबर्ग चालू आठवड्यात अमेरिकन काँग्रेससमोर आपलं म्हणणं मांडणार आहे. त्यापूर्वी सिनेटर्सची भेट घेण्यासाठी तो राजधानी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाला. यापूर्वी त्याने ‘अटलांटिक’ मासिकाला विशेष मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने राजीनाम्याचे वृत्त फेटाळले.
झुकरबर्ग म्हणाला की, “मी वेगळ्या दृष्टीकोनातून काम करतो. पण या प्रकरणी उपस्थित झालेले मुद्दे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.”
झुकरबर्ग पुढे म्हणाला की, “फेसबुकच्या स्थापनेपासून 14 वर्षात आमच्यासमोर अनेक अडचणी आल्या. पण त्या सोडवण्याच्या दिशेने आम्ही यशस्वी काम केलं. याची सुरुवात वसतीगृहाच्या एका खोलीत झाली. पण आज त्याची व्याप्ती फार मोठी झाली आहे. तेव्हा सद्या उपस्थित प्रश्नावर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढू.”दरम्यान, झुकरबर्ग आज सिनेट ज्यूडिशेअरी आणि कॉमर्स समिती संयुक्त सुनावणीत आपलं म्हणणं मांडेल. तर बुधवारी काँग्रेसच्या आणखी एका समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार आहे. पण ब्रिटेन आणि इतर परदेशी समित्यांसमोर आपलं म्हणणं मांडण्यास झुकरबर्गने नकार दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages