Hot Posts

6/recent/ticker-posts

पाणी फाऊंडेशन च्या कामाला पडसाळीगावात उत्साहात

मोडनिंब (प्रतिनिधी)ः सुरूवात  सत्यमेव जयते वॉटर फाऊंडेशन च्या तुफान आलया या ब्रिद वाक्याला साजेसं काम पडसाळी मध्ये चालु आहे.
 जसं काय तुफानच आलंय की काय पडसाळीत असं वातावरण तयार झालंय पुर्ण गावच एक झालंय गावात विरोधकच राहीलं नाही. प्रत्येक घरातून सर्वच्या सर्व महिला पुरुष जसं काय स्वत:च्या घरचंच काम आहे असं समज़ुन बाहेर पडायला लागलेत खरचं पडसाळीत तुफान आलंय अशी चर्चा पंचक्रोषीत नव्हे तालुक्यात चालु आहे. प्रत्येक जण स्वत:च टिकाव, खोर्या, पाटी घेऊन कामाला सकाळी ०७. वाजता न सांगतां हजर राहतोय. प्रत्येकाला दिलेली जबाबदारी पुर्ण करन्यासाठी रात्रीचा दिवस करुन युवक कामाला लागला आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत माढा तालुक्यांतील ४५ गावांनी सहभाग घेतला असुन त्यामध्ये पडसाळी गावाने आतापर्यंत २८ गुण मिळवून आघाडी घेतली आहे.
 या कामामध्ये महिलांची उपस्थितीत लक्षणीय असुन सर्व गावकर्यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे महाराष्ट्रचा कप पडसाळीत आणायचा असा निर्धार केला आहे. या श्रमदानाच्या कार्याला पडसाळी गावातील लहान मुलांपासुन युवक- युवती तसेच वडीलधारी मंडळी महिला तसेच वृध्दांसह अपंग व्यक्तीसुध्दा या कार्याला मोलाच योगदान देत आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments