उ.सोलापूर (प्रतिनिधी)ः गुळंवची ता उत्तर सोलापूर येथे पाणी फांऊडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेंचे शनिवारी रात्री १२ वाजले पासून सुरुवात झाली असून गुळवंची ग्रामस्थांनी या स्पर्धेसाठी जोरदार आघाडी घेतली आहे. स्पर्धेचे उद्घाटन रात्री १२ वाजता भजन करुन करण्यात आली. यावेळी पाणी फांऊडेशनचे राज्यसमन्वयक डॉ. अविनाश पोळ, विकास पाटील आवर्जुन उपस्थित होते.
यावेळी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच गावातील तरुणवर्ग यासाठी चांगलाच सक्रीय झाला आहे. यावेळी वॉटर कप स्पर्धेंअर्ंतंगत गावचा विकास आपल्याच हातात ही संकल्पना समोर ठेवून कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी दररोज दोन तास श्रमदान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आता अबालवृध्द ही पुढे येत आहेत. श्रमदानातुन गावात रोपवाटिका, सीसीटी, डीपसीसीटी, खोलीकरण, नाला रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत तसेच शोषखड्डे घेवून गाव डासमुक्त आणि घाणमुक्त करण्याची शपथ यावेळी गावकर्यांनी घेतली. तर रविवारी सकाळी सिनेअभिनेत जितेंद्र जोशी यांनी श्रमदान होत असलेल्या ठिकाणी भेट दिली तसेच स्वता श्रमदान करुन उपस्थितांना प्रोत्साहित केेले.तर डॉ अविनाश पोळ यांनी वाटर कप स्पर्धा काय आहे व त्यासाठी गावकर्यांनी आता काय करायला हवे.याची सविस्तर माहिती दिली. तर यामध्ये राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येवून गावच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन केले. तसेच गावातील जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये विविध मार्गांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
0 Comments