प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष महिबुब तांबोळी यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष फारूक मटके, सचिव अय्युब नल्लामंदू, जाफर बांगी, सुमीत फुलमारी यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. त्यानंतर सय्यद इक्बाल यांनी साकारलेले विरसाचे बोध चिन्हाचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते संजय हळदीकर म्हणाले नाटक हा समाज उपयोगी माध्यम आहे मी गेल्या २५ वर्षांपासून नाटकांचा दिग्दर्शन ही केले व नाटक सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केले आणि आज मी समाधानी आहे. परंतु कलेचे जतन करण्यासाठी विरसा सारखे अनेक संघटनेची गरज आहे.
दुसरे वक्ते मुंबईचे मुजीब खान म्हणाले, नाटकात भाषा आड येत नाही प्रत्येक नाटकाची भाषा वेगळी असली तरी माध्यम याज उपयोगीच आहे. मी भगवान राम व अनेक नाटके केली अनेक अडचणींना गह्या त्या अडचणींना तोंड देत मी नाटके सादर करून कलेला जीवनंत करण्याचा प्रयत्न करीत आहेत व करीत राहीन. अशी ग्वाही दिली. मंचावर सुमीत फुलमाडी, अय्युब नल्लामंदू, महिबुब तांबोळी, फारूख् मटके यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अवेज शेख, वसीम शाबाद, इक्बाल सय्यद, डॉ. इ.जा. तांबोळी, प्रा. डॉ. शफी चोबदार, हय्युम कुरेशी, मुहाफीज सय्यद, जाफर बांगी, मजहर अल्लोळी, समद फुलमाडी इत्यादींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशफाक सातखेड यांनी केले तर आभार मजहर अल्लोळी यांनी मानले.
0 Comments