प्रा.कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 9, 2017

प्रा.कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

अकलूज (प्रतिनिधी)ः पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या १ एप्रिलला ७५ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार २ एप्रिल रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी माढा तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शेडशिंगे येथील लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुका पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शेडशिंगे या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुलांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले व शेडशिंगे गावचे सरपंच महेश मारकड यांचे हस्ते वही पेन वाटप करण्यात आले.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका संपर्क प्रमुख उमेश वाघमारे,माळशिरस तालुका युवक अध्यक्ष अभिजीत गायकवाड,गुरु गायकवाड,माढा तालुका कार्याध्यक्ष विनोद सरवदे,पप्पू देशमुख,परशुराम आरडे,उमाजी नाईक संघटनेचे अध्यक्ष कैलास शिरतोडे,वैभव शिंदे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भारत डांगे आदीसह शिक्षक,शिक्षिका,विधार्थी यांचेसह मोठ्या संखेने पदाधिकारी  यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष विनोद सरवदे व पप्पू देशमुख यांनी परिश्रम घेतले तर आभार ग्रामपंचायत सदस्य धनाजी सरवदे यांनी मानले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages