सोलापूर (प्रतिनिधी)ः- मातृत्व ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. कोणत्याही स्त्रीला गर्भारपणापासून मूल जन्माला येईपर्यंतचा काळ अत्यंत महत्वाचा असतो. मात्र हल्ली नैसर्गिक प्रसुतीऐवजी कृत्रिम म्हणजेच सिझेरियन पध्दतीने प्रसुतीकरण्याच्या घटना वाढत आहेत. वास्तविक पाहता नैसर्गिक प्रसुती का ? सिझेरियन पध्दतीने (शस्त्रक्रियेने) करायची हा निर्णय त्या त्या प्रसुुती तज्ञावर अवलंबून असतो. तसेच स्त्रीच्या शारीरिक परिस्थितीनुसार हा निर्णय घेण्यात येत असल्याचे प्रसुती तज्ञ सांगतात. मात्र दिवसेंदिवस सिझेरियन पध्दतीने शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाण वाढत असून यामागे आर्थिक लाभाचा उद्देश असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. आई होणं ही कुणाही महिलेच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची बाब असते. या आनंदाच्या भरात बाळाचा जन्म कसा होतो, याकडं आपण साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचाच फायदा उकळतात ते काही धनलोभी डॉक्टर... नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालण्यावर डॉक्टरांचा भर असतो.
सुबर्णा घोष यांनी सिझेरियन ऑपरेशनच्या विरोधात एक अभियान सुरू केलंय... गेल्या काही वर्षात गर्भवती महिलांमध्ये सिझेरियन ऑपरेशन करण्याचं प्रमाण वाढलंय. सर्व हॉस्पिटल्सनी किती सिझेरियन शस्त्रक्रिया केल्या, याची माहिती देणं बंधनकारक व्हावं, अशी मागणी घोष यांनी लहरपसश.ेीस या वेबसाइटच्या माध्यमातून केलीय. दोन महिन्यात तब्बल दीड लाख लोकांनी त्यांच्या या अभियानाला पाठिंबा दिलाय.
अनेकदा डॉक्टर नव्हे, तर रूग्णच सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी आग्रह धरतात. विशिष्ट शुभदिनी, शुभ मुहूर्तावर बाळ जन्माला यावं, यासाठी ज्योतिषांचा सल्ला घेऊन सिझेरियन करणारे महाभागही या देशात कमी नाहीत... उहरपसश.ेीस ने आरटीआयखाली गोळा केलेल्या माहितीनुसार, - २०१५ मध्ये मुंबईत सरकारी हॉस्पिटल्समध्ये २१,७४४ मुलांचा जन्म सिझेरियननं झाला. - २०१० मध्ये हेच प्रमाण ९,९५३ एवढं होतं
- याचा अर्थ पाच वर्षात मुंबईत सिझेरियन शस्त्रक्रियांची संख्या दुपटीनं वाढलीय हेच चित्र कमी अधिक प्रमाणात राज्यभर आणि देशभर आहे.
सिझेरियन शस्त्रक्रिया खर्चिक तर असतेच, शिवाय आई आणि बाळ या दोघांसाठीही जीवघेणी असते. ऑपरेशनच्या वेळी काही चूक झाली तर आयुष्यभर आजारांचा सामना बाळाला करावा लागू शकतो. मातेला रक्तस्त्रावासोबतच जंतूसंसर्ग होण्याचीही शक्यता असते. सिझेरियननं जन्माला आलेल्या बाळांची रोगप्रतिकारक क्षमताही कमी असते, असं काही प्रसुतीतज्ञांचे मत आहे. मात्र, तरीही अनेक हॉस्पिटल्स आणि डॉक्टर बिनदिक्कतपणं गर्भवती महिलांनी सिझेरियन करावं, यासाठी दबाव आणतात. नॉर्मल डिलिव्हरीबाबत दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. बाळाच्या जन्माबाबत योग्य माहिती मातेला दिली जात नाही. आपल्या बाळाला जन्माला कसं घालायचं, हे ठरवण्याचा अधिकार खरं तर आईलाच असायला हवा. मात्र तसे होत नाही. वाढत्या सिझेरियन प्रसुतींमुळे त्यामागच्या हेतूंवरही समाजात शंका निर्माण व्हायला लागल्या आहेत. या शंका वैद्यकिय व्यवसायिकांसाठी ही हानिकारक आहेत.

No comments:
Post a Comment