सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांची व पोलिसांची भूमिका महत्वाची - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 9, 2017

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांची व पोलिसांची भूमिका महत्वाची

माढा (प्रतिनिधी)ः आजच्या पिढीमध्ये संगणक, मोबाईल, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स ऍप यामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे हे प्रमाण रोखण्यासाठी पालकांची व पोलिसांची भूमिका महत्वाची आहे. माढा पोलिस स्टेशनचे सपोनि अतुल भोस यांनी चांगल्या पद्धतीने सामाजिक सलोखा आणि प्रशासकीय कामकाज यांचा सुवर्णमध्य साधण्याचे काम केल्याचे गौरवोद्गार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील त्यांनी काढले आहेत. ते माढा येथील पोलिस स्टेशनमध्ये नव्याने उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन व माढा शहरामध्ये माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या पुढाकारातून व  लोकवर्गणीतून बसविलेल्या १६ सी सी टीव्ही कॅमे-यांचा लोकार्पण सोहळयाच्या प्रसंगी दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी सायंकाळी बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस म्हणाले की, येथील राजकीय नेतेमंडळीनी  विकासकामासाठी एकञ येऊन सहकार्य केल्याने आणि लोकवर्गणी जमा झाल्यानेच ऍम्बुलन्स व १६ सी सी टि व्ही कॅमेरे यांचे लोकार्पण करता आल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, माढा शहरात सण, उत्सव, समारंभ, जयंत्या हे रचनात्मक पद्धतीने कार्य करून साज-या होतात ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि इतरांना प्रेरणादायी आहे. माढा शहरातील अपघात, गुन्हेगारी व वाहनचोरी रोखण्यासाठी या सी सी टिव्ही कॅमे-यांचा निश्चितच उपयोग होणार आहे. गावोगावी दारूबंदी करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा तसेच मोठ्या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाच्या वेळी जनतेने पोलिसांना मदत व सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी बोलताना केले. पोलिस पाटलांनी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करावे लवकरच त्यांना कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. आपल्या देशात १ लाख लोकसंख्येच्या प्रमाणात सरासरी १२० पोलिस कार्यरत आहेत परंतु सोलापूर जिल्ह्यात हे प्रमाण फक्त ६९ असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. महिलांनी १०९१ या पोलिस हेल्पलाईनचा संकटसमयी वापर करावा तसेच इतरांनाही १०० नंबरचा योग्य कारणांसाठी वापरावा असा सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला.
यावेळी माढा पोलिस स्टेशनची पाहणी व तपासणी करण्यात आली. पोलिस स्टेशनच्या कामकाजाबाबत कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्न, समस्या व अडचणी याविषयी समर्पक उत्तरे देत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी  उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद भोसले म्हणाले की, माढा पोलिस स्टेशन व सपोनि अतुल भोस यांच्या कामकाजाबाबत येथील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. येथील पोलिसांचा जनतेशी चांगला सुसंवाद आणि सहकार्य आहे. अधिकारी मारहाण प्रकरणी शासकीय अधिका-यांना मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या कार्यक्रमासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद भोसले, बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे ,नगराध्यक्ष गंगाराम पवार,उपनगराध्यक्षा ऍड. मिनलताई साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार नाना भांगे,  भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, नगरसेवक शहाजी साठे, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर , वनिता शहाणे, शीला खरात, नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते राजू गोटे, माढा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्तात्रय अंबुरे, रोटरीचे अध्यक्ष नागनाथ घाडगे, नगरपंचायतीच्या सभापती कल्पना जगदाळे, प्रभाकर जाधव, नगरसेविका संजीवनी भांगे, राणूबाई गाडे, नगरसेवक ऍड. नागनाथ शिवपुजे, शिवाजी जगदाळे, डॉ.सुभाष पाटील, मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे, शंभू साठे, राजाभाऊ लोंढे, उपसरपंच भारत लटके, अजिनाथ माळी, दादा नागटिळक, मच्छिंद्र मोरे, महेंद्र शहा, अमोल चवरे,   यांच्यासह माढा शहर व परिसरातील पदाधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच आणि पोलिस पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन डी. व्ही. चवरे यांनी तर आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages