मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निधीची संसदेत खा.धनंजय महाडिक यांची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2016

मतदारसंघाच्या विकासकामांसाठी निधीची संसदेत खा.धनंजय महाडिक यांची मागणी

मोहोळ (प्रतिनिधी)ः-  वाढती लोकसंख्या, मतदारसंघाचा विस्तार आणि विकासकामांची क्षमता लक्षात घेऊन खासदार निधीत वाढ करून हा वार्षिक निधी २५ कोटी रुपये करावा, अशी मागणी भीमा कारखान्याचे चेअरमन तथा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत मांडली. या मागणीला लोकसभेतील बहुतांश खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. खासदार महाडिक म्हणाले की, एखाद्या गावामध्ये समाजमंदिर किंवा सांस्कृतिक हॉल पूर्वीपासून अस्तित्वात असेल तर त्या गावाला गरज असूनही नवा हॉल बांधण्यासाठी खासदार निधीचा वापर करता येत नाही. त्यामुळे आवश्यकतेनुसार भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर, हॉल, गावासाठी नवा सांस्कृतिक हॉल बांधण्यास किंवा विस्तारीकरण करण्यास खासदार निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी.
सध्याच्या नियमानुसार एखाद्या गावात यापूर्वी समाजमंदिर किंवा सांस्कृतिक सभागृह बांधले असेल तर त्याचे विस्तारीकरण करण्यास किंवा नागरिकांच्या मागणीनुसार नवे सभागृह बांधण्यास खासदार निधी खर्च करता येत नाही. वास्तविक अनेक गावातील अशा प्रकारची सांस्कृतिक सभागृहे आता अपुरी पडत आहेत किंवा त्यांची पडझड झाल्याने दुरुस्ती किंवा विस्तारीकरण करणो आवश्यक आहे. मात्र, जनतेची मागणी असूनही आणि खासदार निधी देण्याची इच्छा असूनही कायद्यात तशी तरतूद नाही. याबाबत खासदार महाडिक यांनी सभागृहात स्पष्ट भूमिका मांडल. शासकीय कार्यालयांची स्वच्छता, इमारतींची दुरुस्ती, ग्रंथालयातील पुस्तके, विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग सुविधा यासाठीसुद्धा खासदार निधी खर्च करता यावा. लोकसभेचा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठे असतात. ग्रामीण भागातील रस्ते, गटारी, जलशुध्दीकरण केंद्र अशी कामे मार्गी लावण्यासाठी खासदार निधीमध्ये भरघोस वाढ करणो आवश्यक आहे. वार्षिक २५ कोटी रुपये निधी मिळावा, अशी ठाम मागणी खासदार महाडिक यांनी केली. खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत मांडलेल्या या मुद्दयांना संसदेमधील बहुतांश खासदारांनी टाळ्या वाजवून पाठिंबा दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages