जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल दिनानिमित्त आयोजित उत्कृष्ठ अधिकारी कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. येथील रंगभवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. एन. मालदार, अश्विनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुलकर्णी, रेश्मा माळी, मनीषा कुंभार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रणजीतकुमार म्हणाले, महसूल विभाग हा राज्य शासनाचा कणा आहे. कारण शासनाची अनेक महत्वाची कामे महसूल विभागाकडूनच पार पाडली जातात. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने आणि अधिकारी कर्मचार्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
जिल्हाधिकारी रणजीतकुमार म्हणाले, महसूल विभागासमोर बदलल्या परिस्थितीतील अनेक आव्हाने पुढे येत आहेत या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बदलांना आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. सेवा जलदगतीने देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि व्यावसायिकतेचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. एन. मालदार आणि आश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांचीही भाषणे झाली.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी केले. यावेळी महसूल विभागातील विविध अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचार्यांचा मुलांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी संजय तेली, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, प्रवीण गायकवाड त्याचबरोबर तहसिलदार ऋषीकेश शेळके, नागेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment