टेंभुर्णी ग्रामपंचायतीने ग्रामसचिवालया मधील तळमजल्यावर सार्वजनिक सभागूह असताना तो सभागूह दि.२२/७/२००२ साली बेकायदेशीर २९ वर्षाच्या रजिस्टर करार करुन विठ्ठल बझारला सर्व नियम ङावलून दिलेला आहे असे माहीतीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे त्या अनुषंगाने सदर ची पहीली तक्रार दि.२७/६/२०१६ रोजी केली होती तसेच टेंभुर्णी ग्रामपंचायतने २५००चौ.मी.आर सी.सी बांधकाम सहीत असेलेली जागा फक्त ४००० हजार रूपये मासिक भाङ्याने दिली असुन त्या मध्ये आज पर्यत कुठल्याही प्रकारची वाढ केली नाही सार्वजनिक सभागूह भाङ्याने देताना मा.मुख्यकार्यकारीअधिकारी याची कोणत्याही प्रकारची पुर्वपरवांगी घेण्यात आलेली नाही शासकिय जागेचा रजिस्टर करार करुन देण्यात आलेला आहे तो नियम भाह्य आहे रजिस्टर करार करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव करण्यात आलेला नाही भाङे आकङताना बाधकाम विभागाचा मुल्याकन दाखला घेण्यात आलेला नाही
टेंभुर्णी शहर हे ३०००० लोकसंकेचे गाव असून हक्काचे सभागूह असताना टेंभुर्णी करानां ग्रामसभे साठी गावातील लहानशा राम मदिरातअथवा बोरङीगशाळेत बसावे लागते त्या साठी दिलेला करार रद्द करुन तो ग्रामसभेसाठी सभागूह खुले करावे तसेच संपुर्णगावाला गेली १४ वर्षे त्यांच्या हक्कापासुन वंचित ठेवल्याने तत्कालीन ग्रामसेवक नंदकुमार बागवाले व सरपंच टेंभुर्णी ग्रामपंचायत यांनी केलेल्या लोकशाहीचा अवमान केल्याने त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते बशिर जाहागिरदार यानी एक आँगस्टरोजी टेंभुर्णी ग्रामपंचायत समोर अमरण उपोशनाससकाळी १० वाजल्यापासुन सुरवात केली असुन त्याच्या समावेश रणधीर जगताप माणिक लोंढे आनिल जगताप गौतम कांबळे संतोष सोनवने सुधीर इंदलकर राजु कांबळे यशपाल लोंढे आनिल आरङे मोहण कांबळे नाथा सावंत युवाराज वजाळे रुपेश ढावरे उपोशनास बसले असुन या ऊपोशन ठिकाणी भा.ज.प.चे तालुका आध्यक्ष संजय कोकाटे शिवसेना शहर प्रमुख सुरेश लोंढे यांनी समक्षाभेट देऊन पाठिंबा जाहिर केला
No comments:
Post a Comment