पोतराज परंपरेमुळे अंधश्रध्देला खतपाणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2016

पोतराज परंपरेमुळे अंधश्रध्देला खतपाणी

 देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्ष पूर्ण झाली तरीसुध्दा अज्ञान व अंधश्रधेचं भूत मानुगतिवरून खाली उतरलेंल नाही. वाघिणी दूध (शिक्षण) इथल्यात शिक्षण लोकांनी खालीपर्यत पोचू दिलं नाही त्यामुळेच आजही सर्व समाज अंधश्रधेच्या जोखडानं बाधून टाकलाय. थोर समाजसेवक मधलामहात्मा जोतिबा फुले यांनी तळागाळात शिक्षणगंगा पोचविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली. तरीदेखरील आज प्रत्येक धर्मात अनेक लोक अंधश्रध्देचा बागुलबुवा घेवून मिरवित आहेत. नरबळी, गुप्तधन, भानामती, भूत, चेटकी, करणी, जादू टोणा आदी प्रकारासाठी लोकांना प्रवृत्त करुन त्यावर उपाय म्हणून त्यांची लुबाडणूक अनेक करणारी अनेक दुकाने शहरात, गावात राजरोसपणे चालू आहेत. वास्ताविक पहाता कोणत्याच ग्रंथात किंवा पुस्तकात अशा वाईट अंधश्रध्देला अजिबात थारा नाही. मात्र आपमतलबी लोकांची टोळी पोट भरण्यासाठी सर्वसामान्यांना फसवून स्वतःची दुकानदारी चालवित आहेत. देव दगडात नसून देव माणसात आहे. ‘तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी’ या संतवचनाप्रमाणे ईश्वर जवळ आहे. त्यांच्यावर श्रधा ठेवावी मात्र ती अंधश्रध्दा नसावी. ज्या गोष्टीला तत्वाचा ज्ञानाचा आधार असतो. अशाच गोष्टी मनुष्यानी स्वीकारव्यात. तरच देशाचा विकास होईल. अंधश्रध्देमुळे सर्व समाजाची प्रचंड अधोगती होत आहे. विज्ञानाच्या जोरावर मनुष्याने आज चंद्रावर पाऊल टाकलं. एक मिनिटात जगाचा विनाश होईल. एवढा आर्थिक विकास झाला.
विज्ञान शाप की वरदान त्याचा वापर आज कसा होतोय. तंत्रज्ञान विकसित झालं. मोबाईल व व्हाटऍपमुळे जग जवळ आलं. तिततंच ते दूरसुध्दा गेलं. कारण आजही ग्रामीण भागातील समाज अंधश्रध्देच्या चिखलात अडकून पडलाय. अंधश्रध्देवर आधारलेल्या व अज्ञानी जनतेकडून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही अनिष्ठ रुढी, परंपरा आजही पूर्वीप्रमाणे तशाच असल्याचे चित्र दिसून येते. यापैकीच एक प्रथा म्हणजे पोतराज... आषाढ महिन्यात सर्वत्र मरीआईच्या जाखाई... जोखाईच्या... जत्रांना पेव फुटलंय. देवीच्या समोर हलगीच्या तालावर, केस मोकळे सोडून अंगात येणार्‍या महिलांचे चित्र आजही बघायला मिळते.
पोतराज ही परंपरा ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातसुध्दा आजही टिकून आहे. ग्रामीण भागात मनोरंजन व प्रबोधनासाठी बहुरुप्याप्रमाणेच पोतराज लोककलेचा जन्म झाला. ही लोककला ग्रामीण नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुबळा समाजाला ज्याकाळी शिक्षणाचा  आधार नव्हता तेव्हाच ही लोककला  गावागावात रुजली. त्यामुळेच अंधश्रध्देला उधाण आलं मात्र अलीकडे मॉर्डन युगाचं वारं वाहू लागल्यानंतर पोतराज लोककला दुर्मिळ होऊ लागली आहे. मरीआई, कडकलक्ष्मीचा भक्त म्हणून पोतराजाची ओळख देवीचा मान. पोतराजाला असतो. त्यानंतरच देवीसमोर हाले कापले जातात. त्याला कायरं असं नाव आहे.
कमरेला विविध रंगाचे वस्त्र परिधान केलेला. पायात चाळ बांधलेला, कपाळभर मळवट भरलेला. तोंडाला लालभडक शेंदूर फासलेला, हातात आसूड घेतलेला पोतराज बघून लहान मुले पूर्वी  घाबरुन घर गाठायची. आजची तंत्रज्ञानाची मुलं पोतराज न घाबरता त्यांच्याशी मैत्री करतात. ही प्रथा ग्रामीण भागात आजही खोलवर रुतलेली आहे.  फक्त आषाढ महिन्यात पोतराज पुन्हा दुसरा धंदा करतो असे एका पोतराजाने सांगितले. मंगळवार व शुक्रवारी हे पोतराज देवीच्या नावे भिक्षा मागून पूर्वी जगत होते. आज मात्र हे दृश्य नामशेष होत आहे. जसा शिक्षकाचा मुलगा, शिक्षक, डॉक्टरचा डॉक्टर, वकिलाचा वकील झाला. तसा पोतराजाचा मुलगा पोतराज झाला. मात्र बदलत्या वार्‍याबरोबर पोतराजही बदलले त्यांची मुलेही बदलली आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन झाल्यामुळे अंधश्रध्देवर ते मात्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अंधश्रध्देचा पगडा झुगारुन शिक्षणरुपी वाघीनीचं दूध पिण्यासाठी स्वतःहून पुढं आलं पाहिजे. तरचं समाज प्रगत होईल. अन्यथा पूर्वीप्रमाणेच मागास राहिलं. नवीन वाट शोधल्याशिवाय खडतर प्रवास थांबार नाही. अंधश्रध्देला मुठमाती दिल्याशिवाय नवनिर्माण होणार नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages