लोकनेते बाबुरावआण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदार शिबीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 22, 2016

लोकनेते बाबुरावआण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदार शिबीर

मोहोळ (प्रतिनिधी)ः- माजी आमदार तथा लोकनेते बाबुरावआण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी तरूण मंडळाच्या वतीने अनगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक तथा अनगरचे सरपंच अजिंक्यराणा पाटील यांनी दिली. लोकनेते पाटील यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम जात आहेत. अनगरचे सरपंच तथा छत्रपती शिवाजी तरूण मंडळाचे अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी गेल्या सहा वर्षांपासून अनगर येथे रक्तदान शिबीर घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या शिबिरात विक्रमी रक्तदान होते. प्रतिवर्षापासून यंदाही १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता या रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. तालुक्यातील रक्तदात्यांनी शिबीरामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सरपंच पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages