सर्वसाधारण खुल्या गटासाठी २३ नागरिकांचा मागासप्रवर्ग ११ आणि अनुसूचित जातीसाठी ६ असे आरक्षण पडले असून यात ५० टक्के महिला असणार आहेत. प्रांताधिकारी शहाजी पवार, मुख्याधिकारी त्रिंबक ठेंगळे पाटील यांनी चिठ्ठ्या टाकून नियमाप्रमाणे आरक्षण जाहीर केले. आरक्षण जाहीर होताच थंडावलेल्या राजकीय हलर्गीचा निनाद पुन्हा सुरु झालाय.
सध्या बार्श नगरपरिषद माजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. तर पंचायत समिती माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात आहे. आजपर्यंतच्या सर्व लढती राऊत-सोपल गटामध्ये झाल्या. काट्याच्या टक्करी बार्शीशिवाय इतर ठिकाणी होत नाहीत. शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन नाचणारे अन् तिकिट नाकारताच सेनेचा भगवा अर्ध्यावरच सोडून भाजपाच्या कळपात डेरेदाखल झालेले विधानसभेला राजकीय आखाड्यात शड्डू ठोकणार्या भाजपाच्या राजेंद्र मिरगणे यांच्या रुपाने बार्शीत भाजप आपली पाळेमुळे रोवू लागला आहे. गृहनिर्माण संस्था उद्घाटनाच्या निमित्ताने बार्शीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलावून शक्तीप्रदर्शन करण्यात मिरगणे यशस्वी झाले. मात्र या दोन मातब्बर नेत्यांच्या ताकदीचा अंदाज घेणं गरजेचं आहे. कारण बार्शीत भाजपाला पोषक वातावरण सध्यातरी नाही.
हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून कडवा शिवसैनिक ते आमदार इथपर्यंत घौडेदौड करणारे मातब्बर सोपालांना धूळ चारणारे जिवंत वाघावर बसून मातोश्री गाठणारे माजी आमदार राजेंद्र उर्फ राजाभाऊ राऊत यांनी निर्माण केलेलं भगवं वादळ, भगवी सुनामी लाट अडविण्याची ताकद फक्त राष्ट्रवादीचे मुत्सुद्दी नेते आमदार दिलीप सोपल यांच्याकडेच आहे. पाचवेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवून जिंकणारे सोपल यांना मानणारा प्रचंड शेतकरी व युवा वर्ग आहे. त्यामुळे बार्शीचा सामना दुरंगी होणार ..! यात शंका नाही. भाजपामुळे तो सामना नाममात्र तिरंगी होईल खर्या अर्थाने सोपल राऊत गटात पुन्ह धुमश्यक्री कडव्या, काटे की टक्कर बघायला मिळेल. दोन गटांमध्ये मोर्चबांधणी सुरु झाली असून गुप्तगू वाढल्याने मिरगणेची पंचायत झाली आहे.

No comments:
Post a Comment