ना.सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 17, 2016

ना.सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

बार्शी (प्रतिनिधी)ः- राज्याचे नुतन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवडीबद्दल बार्शी शहर व तालुका भाजपाने आयोजित केलेल्या भव्य सत्कार समारंभ आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये तालुक्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी, जिल्हाध्यक्ष शहाजीराव पवार, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र मिरगणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.पद्मजा काळे, जिल्हा सरचिटणीस सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव, महिला तालुकाध्यक्ष उज्जवला जाधव, तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, शहराध्यक्ष आश्‍विन गाढवे आदी उपस्थित होते. यावेळी बार्शी शहरातील कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष माणिक पवार, बापू नाळे, जयपाल राऊत, नितीन जाधव, प्रमोद सोनवणे, बापू बोकेफोडे तसेच ग्रामीण भागातील शेंद्रीचे रंगनाथ गांेंदील, सदाशिव गोंदील, शहाजी भोसले, सलीम सय्यद, रमजान सय्यद, तसेच श्रीपत पिंपरीचे अरुण ताकभाते, तसेच बावी(आ) दिलीप पाटील, तसेच काटेगावचे अब्जल पटेल, उपळाई ठोंगे या गावचे लहु शिंदे, राजेंद्र सदावरते, रशीद शेख, दशरथ माने, बाळासाहेब घाडगे, राजाभाऊ मोरे, उत्रेश्‍वर ठोंगे, चॉंद शेख, अरुण वैद्य, बांगरवाडी या गावचे अदम पठाण, शरीफ फकीर, शारुख पठाण, राजेंद्र वणदेवकर,  बाभुळगाव या गावचे संग्राम पाटील, पानगावचे भैरु मोरे, साकत या गावचे राजाभाऊ मोरे, भारत वाघ, नवनाथ मोरे, ४२२ चे गवूसभाई गफूर मोरे आदीसह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा ना.देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages