विडी कामगारांचे विदारक वास्तवादी जीवन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 17, 2016

विडी कामगारांचे विदारक वास्तवादी जीवन

दादासाहेब निळ
हुतात्म्यांचे शहर म्हणून सोलापूर शहराची ओळख सर्वदूर झाली. कष्टकर्‍यांचे, यंत्रमागधारकांचे विड्या ओळणार्‍याचे शहर, चादरीचे सोलापूर अशा विविध अंगांनी शहराचं नाव सर्वदूर प्रसिध्द आहे. परप्रांतातून सोलापूरात पोटाचा खळगा भरण्यासाठी आलेल्या पद्मशाली समाजाच्या बांधवांनी शहरात कष्टरुपी घाम गाळून आपली ओळख करुन दिली. कामगारांच्या जीवनाशी सातत्याने रक्ताचं नातं जोडणारा कामगार नेता  म्हणून सोलापूरकरांनी कॉ.आडम मास्तर यांना पसंती दिली. मास्तरांनी विडी कामगार हाच आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानला अन् सातत्याने घाम गाळत राहिले. अनेक वेळा रस्त्यांवर उतरुन उग्र आंदोलने छेडली. सरकारला जाग आणली. विडी कामगाराचा नेता म्हणून मास्तरांनी कामगाराच्या मनात कायमचे घर केल्याने त्यांना विडी कामगारांनी विधानसभेत पाठविले. विडी कामगारांचा आवाज विधानसभेत घुमला. या विडी कामगाराच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कॉ.आडम मास्तरांनी कुंभारी परिसरात गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्था उभा करुन विडी वळणार्‍या गरीबांना हक्काची पक्की घरे दिली.
शहरात ७० हजार विडी कामगार असून त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सुमारे ४ लाख लोकांची वैद्यकीय सोय व्हावी या उद्देशाने विडी कामगार हॉस्पिटलचा प्रस्ताव शासनदरबारी गेल्या कित्येक दिवसांपासून अडकून पडला आहे. रेड सिग्नलच्या कचाट्यात अडकून पडलेल्या हॉस्पिटचा पायाभरणी शुभारंभ कधी होणार ? असा प्रश्‍न विडी कामागर वर्गातून विचारला जात आहे. लोकप्रतिनिधीं व कामगार संघटनांचा आवाज पुन्हा एकदा एकदिलाने विधानसभेत गर्जल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही हे सत्य आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रत्येक हक्क मागण्यासाठी विडी कामगारांचा लढा सातत्याने सुरुच आहे. सरकार विडी कामगारांची अवहेलना करीत असल्याने एकीची हाक देण्याची गरज आहे.
केंद्रीय श्रममंत्रालयाकडून विडी कामगारांच्या कल्याणकारी योजनांसाठी कोट्यावधींचा निधीची तरतूद आहे. विडी कामगारांच्या घरकुलांसाठी अनुदान, पाल्यांना शिष्यवृत्ती तसेच वैद्यकीय उपचारासाठी मदत अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत घरकुल बांधण्याच्या अनेक योजना सोलापूरात राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत घरकुल बांधण्याच्या अनेक योजना सोलापूरात राबविण्यात आल्या. हैद्राबाद रोड इंदिरा गांधी विडी गृहनिर्माण प्रकल्पात सन १९८७ साली सुमारे साडेचार हजार घरे बांधण्यात आली. माकपाच्या पुढाकाराने दहा हजार घराचा गोदूताई प्रकल्प आशिया खंडात रेकॉर्ड झाला. त्यानंतर कामगार सेनेच्या माध्यमातून पाच हजार घरकुले बांधण्यात आली. याशिवाय अन्य संस्थानतर्फे या योजनेअंतर्गत विडी कामगारांना हक्काची घरे बांधून देण्यात आली. घरकुल योजना व लाभ सोलापूराला मोठा झाला आहे. मात्र वैद्यकीय सुविधेबाबत शासन व पदाधिकार्‍यांची भूमिका उदासीन दिसू लागली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य ह्या मूलभूत गरजांपैकी आरोग्य ही अतिशय महत्वाची गरज आहे. मात्र शासन उदासीन असल्यामुळे पाठपुरावा करुनही स्वतंत्र हॉस्पिटल बांधण्याची योजना अद्याप साकार होऊ शकली नाही.
विडी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना उपचार, आजारावर इलाज घेण्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत दिली जाते. विडी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना एकाच ठिकाणी उपचाराची सोय व्हावी याच उदात्त हेतूने स्वतंत्र हॉस्पिटलची मागणी गेल्या १५-१६ वर्षापूर्वी केली. तत्कालीन  खा.सुभाष देशमुख यांनी प्रास्ताव देऊन इमारत बांधली मात्र राजकारण आडवे आल्याने वारंवार पाठपुरावा करुनसुध्दा बापूंना मंजुरी न मिळाल्याने बापूंनी हॉस्पिटलचा नाद सोडला. आता सेना व माकपने यांसदर्भात आवाज उठविला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages