सांगोल्यामध्ये कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 25, 2016

सांगोल्यामध्ये कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

सांगोला (प्रतिनिधी)ः- कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिचा निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ सांगोला येथील व्यापारी महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेसह विविध संघटनांनी घटनेच्या निषेधार्थ सांगोला बंदची हाक दिली होती. या बंदला सांगोला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. २३ जुलै रोजी सर्व व्यापार्यांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी होत कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद काळात शहर परिसर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी बंद दरम्यान कडक बंदोबस्त ठेवला होता.
अशा प्रकारचे संवेदनशील खटले जलदगती न्यायालयात चालविले जावेत, कोपर्डी येथील पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शासनाने त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशा घटना भविष्य काळात घडू नयेत म्हणून अधिवेशनात कठोर कायदा करुन त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशा विविध मागण्याचे निवेदन तहसिलदार श्रीकांत पाटील व पो.नि. हारुण शेख यांना देण्यात आले. यावेळी सतिश वाघ, बाळासाहेब मस्के, अरविंद केदार, नगरसेवक चंदन होनराव, बापूसाहेब भाकरे, बाळासाहेब शिंदे, गुंडा खटकाळे, वैभव केदार, तानाजी खंडागळे, अमोल पवार, सचिन शिनगारे, भारत साळुंखे, नवनाथ खटकाळे, समीर पाटील, संदिप जगताप, दत्तात्रय इंगोले, अविनाश नलवडे, विनोद केदार, महेश नलवडे, विशाल नलवडे, सागर गायकवाड, दत्तात्रय सावंत, प्रताप इंगोले, मिनाज खतीब यांच्यासह व्यापारी बांधव व कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कोपर्डी व सांगोला तालुक्यातील लोटेवाडी येथील घटनेच्या निषेधार्थ व्यापारी महासंघ व विविध संघटनेने एक दिवस अगोदर सांगोला बंदची हाक दिली होती. सकाळपासून सांगोला शहरातील वासुद चौक, मिरज रोड, महात्मा फुले चौक, एस.टी.स्टँड परिसर, कडलास नाका, वाढेगाव नाका, नेहरु चौक, शिवाजी चौक, जयभवानी चौक व तहसिल कार्यालय परिसरातील सर्वच व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे शहरात शुकशुकाट होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages