माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील विद्यालयात इ. ५ वी ते ११ वी मधील गुणवंत विद्यार्थी, विविध क्रीडा स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कार्यकर्ते अशा ९२ जणांचा सत्कार सोलापूर जिल्हा जनसेवा संघटनेचे अध्यक्ष सतीश पालकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्राचार्य चंद्रकांत कोळेकर, जनसेवेचे तालुकाध्यक्ष नारायण सालगुडे पाटील, सरपंच प्रताप सालगुडे-पाटील, आप्पासाहेब रूपनवर, सोपान जाधव, सुधीर रास्ते, उपसरपंच वीरकुमार दोशी, महिला शिवसेना तालुका प्रमुख ज्योतीताई कुंभार, संयोजक दादासाहेब जाधव, गुलाबराव निंबाळकर, मयुरेश माने, सागर देशमुख, मुख्याध्यापक देठे, पवार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment