विठ्ठल सहकारी कारखान्याच्या मिल रोलचे पूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 25, 2016

विठ्ठल सहकारी कारखान्याच्या मिल रोलचे पूजन

गुळसाळे (प्रतिनिधी)ः- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या २०१६-१७ हंगामातील मिल रोलचे पूजन संचालक विजयसिंह देशमुख, नारायण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, संचालक मोहन कोळेकर, दशरथ खळगे, दिनकर पाटील, सूर्यकांत बागल, भगिरथ भालके, गोकुळ जाधव, नेताजी सावंत, बाळासाहेब गडदे, महादेव देठे, संतोषकुमार गायकवाड, राजाराम भिंगारे, बाळासाहेब लोंढे, माजी संचालक धनाजी घाहगे, कार्यकारी संचालक आर. डी. पाटील, एम. सी. आतकरे, एम. व्ही. चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.
आ. भारत भालके यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात चालू हंगामासाठी गाळप क्षमतेनुसार आवश्यक ऊस उपलब्ध असून सभासदांच्या उसाचे पूर्णपणे गाळप होण्याच्या दृष्टीने हंगाम १ ऑक्टोबर सुरू करण्यात येणार आहे. ऊस तोडणी वाहतुकीसाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. त्यादृष्टीने कारखान्याच्या दुरूस्तीची कामे वेळेत व उत्तम दर्जाची पूर्वी करावीत आणियेत्या हंगामात चांगला साखर उतारा मिळवून कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडावा, असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages