टेंभुर्णी (प्रतिनिधी)ः टेंभुर्णी येथील सार्वजनिक सभागृह बेकायदेशीर रित्य २९ वर्षाच्या करारावर विठ्ठल बझारला किराणा दुकानला दिलेला करार रद्द करावा व करार करणार्या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागिरदार यांनी एक आँगस्ट रोजी ग्रामपंचायत समोर उपोषणाचा इशारा दिला आहेटेंभुर्णी ग्रामपंचायतीने ग्रामसचिवालया मधील तळमजल्यावर सार्वजनिक सभागूह असताना तो सभागूह दि.२२/७/२००२ साली बेकायदेशीर २९ वर्षाच्या रजिस्टर करार करुन विठ्ठल बझारला सर्व नियम ङावलून दिलेला आहे असे माहीतीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे त्या अनुषंगाने सदर ची पहीली तक्रार दि.२७/६/२०१६ रोजी केली होती तसेच टेंभुर्णी ग्रामपंचायतने २५००चौ.मी.आर सी.सी बांधकाम सहीत असेलेली जागा फक्त ४००० हजार रूपये मासिक भाङ्याने दिली असुन त्या मध्ये आज पर्यत कुठल्याही प्रकारची वाढ केली नाही सार्वजनिक सभागूह भाङ्याने देताना मा.मुख्यकार्यकारीअधिकारी याची कोणत्याही प्रकारची पुर्वपरवांगी घेण्यात आलेली नाही शासकिय जागेचा रजिस्टर करार करुन देण्यात आलेला आहे तो नियम भाह्य आहे रजिस्टर करार करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव करण्यात आलेला नाही भाङे आकङताना बाधकाम विभागाचा मुल्याकन दाखला घेण्यात आलेला नाही
टेंभुर्णी शहर हे ३०००० लोकसंकेचे गाव असून हक्काचे सभागूह असताना टेंभुर्णी करानां ग्रामसभे साठी गावातील लहानशा राम मदिरातअथवा बोरङीगशाळेत बसावे लागते त्या साठी दिलेला करार रद्द करुन तो ग्रामसभेसाठी सभागूह खुले करावे तसेच संपुर्णगावाला गेली १४ वर्षे त्यांच्या हक्कापासुन वंचित ठेवल्याने तत्कालीन ग्रामसेवक नंदकुमार बागवाले व सरपंच टेंभुर्णी ग्रामपंचायत यांनी केलेल्या लोकशाहीचा अवमान केल्याने त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते बशिर जाहागिरदार यानी एक आँगस्टरोजी टेंभुर्णी ग्रामपंचायत समोर अमरण उपोशनाचा ईशारा मुख्यमंत्री ,ग्रामविकासमंञी,पालक मंत्री ,विभागिय आयुक्त पुणे सोलापूर जिल्हा अधिकारी अधिक ठिकाणी निवेदन देऊन इशारा दिला आहे
No comments:
Post a Comment