बापूंच्या आवाहनाला प्रतिसाद.....
मंत्री झाल्यानंतर प्रथमच जनता दरबार होत असला तरी सत्कारासाठी कुणीही शाल, श्रीफळ, बुके नको तर बुक (पुस्तक) व सत्कार नको सूचना द्या असे आवाहन बापूंनी केले होते. त्याला जनतेनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. भेटायला येणार्या लोकांनी मोठ्या प्रमाणात विविध विषयाची पुस्तके व विविध विषयावर सूचना दिल्या. यामुळे अनेक नवीन संकल्पना समोर आल्या.
जलयुक्त शिवार, जलसंवर्धन लोकभियान योजनेचे जनतेकडून कौतुक
सोलापूर (प्रतिनिधी)ः- जनतेला रोज नवनव्या अडचणींना सामोरे जावे लागते कुठे दखल घेतली जाते तर कुठे निराशाच पदरी पडते त्या जनतेला आपल्या अडचणी मांडण्यासाठी ना. सुभाष देशमुख यांनी १२ वर्षापासून एक जनता दरबार सुरु केला. आजही तो जनता दरबार अव्याहतपणे सुरूच आहे. आता सुभाष देशमुख सहकार मंत्री झाले आणि जनता दरबाराला बहार येतोय. आज मंत्री झाल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातून हि जनतेसाठी वेळ काढून सोलापुरातील संपर्क कार्यालयात जनता दरबार झाला. या जनता दरबारामध्ये आतापर्यंत सोलापुर शहर व जिल्ह्यातील लोक आपल्या अडचणी घेऊन येत होते. आज झालेल्या जनता दरबारामध्ये सहकार क्षेत्रातील जिल्हा ओद्योगिक सहकारी बँक पुनर्जीवन, नागरी सहकारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था. वस्त्रोद्योग क्षेत्रातील इचलकरंजी वस्त्रोद्योग संघटना, लक्ष्मी विष्णू मिल पदाधिकारी बैठक, व पणन क्षेत्रातील ७/१२ असलेल्या सर्व शेतकार्यांना सभासद करून घेण्याचा निर्णय, आडत व्यापार्यांच्या संपामध्ये घेतलेला सकारात्मक निर्णय आदींवर आज दिवसभर बापूंना भेटून आपल्या अडचणी, मागण्या यावर चर्चा केली. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुभाष देशमुख यांनी केलेल्या कार्यामुळे पहिल्याच पावसात बांध पाण्याने भरले आहेत. जलसंवर्धन लोकअभियान राबवून हिप्परगा तलावातील गाळ काढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. त्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आज अनेक शेतकरी, कष्टकरी, जनतेने सत्कारासाठी गर्दी केली होती. आज दिवसभर हजारो लोक आपल्या अडचणी घेऊन जनता दरबारात दाखल दाखल झाले होते. सहकार मंत्र्यांनी अडचणी घेवून आलेल्या जास्तीत जास्त लोकांच्या अडचणी जागेवर सोडवल्या हे विशेष.

No comments:
Post a Comment