आडम मास्तर यांचा आज नागरी सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 24, 2016

आडम मास्तर यांचा आज नागरी सत्कार

नागरिकांच्या वर्गणीतून त्यांना ’इनोव्हा’ गाडी भेट



सोलापूर (प्रतिनिधी)ः- शहरातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ३० हजार घरांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पाठपुरावा करुन मंजूर करुन आणल्याबद्दल माकपचे कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा पक्ष तसेच नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार रविवार, दि. २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होम मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती माकपचे एम.एच. शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आडम मास्तर हे सोलापुरात सामान्यांचा आवाज म्हणून ओळखले जातात. विडी कामगारांसाठी १० हजार घरांचा प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडला. आता असंघटीत कामगारांसाठी ३० हजार घरांचा प्रकल्प मंजूर झाला असून येत्या १६ ऑगस्ट रोजी सोलापुरात त्यांचा पायाभरणी समारंभ होत असून या कार्यक्रमास पंतप्रधान, ना. व्यंकय्या नायडू, कॉ. खा. सिताराम येचूरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दरम्यान, रविवारी कॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते हा नागरी सत्कार होत असून यावेळी नागरिकांच्या वर्गणीतून त्यांना ’इनोव्हा’ गाडी भेट दिली जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस कॉ. सिध्दाराम कलशेट्टी, युसुफ मेजर, नसिमा शेख, नलिनी कलबुर्गी, सलीम मुल्ला, सुनंदा बल्ला, शिवानंद झळके उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages