सेमी इंग्रजीमुळे मराठी शाळांची पुन्हा भरारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 24, 2016

सेमी इंग्रजीमुळे मराठी शाळांची पुन्हा भरारी

इंग्रजी शाळेच्या संस्था चालकांच्या चराऊ कुरणावर घाला


दादासाहेब निळ
इंग्रजी  माध्यमांच्या (इंग्लिश मिडियम)च्या व प्रंचड लुटणार्‍या पध्दतीला व मनमानीला रोखण्यासाठी शासनाने शिक्षणपध्दतीत आमुलाग्र बदल केलेल्या असून लोकाचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढणारा कल शासनाच्या  या धोरणामुळे थंडावला आहे त्यामुळे इंग्लिश मिडियम संस्था चालकांचा चराऊ कुरणावर घाला बसण्याची शक्यता आहे गोरगरिबांच्या पोरांना  इंग्लिश शिक्षणाचे फ़ॅड डोक्यात रंगवून प्रंचड पैसा उकळणार्‍या हया टोळयंाना आता पायबंद बसणार आहे.  कारण  शासनाने मराठी माध्यमांच्या अनुदानित शाळंामध्ये तीन सेमी इंग्लिश अभ्यास क्रंमाची सुरूवात केली आहे सेमी इंग्रजी शाळांमुळ इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आव्हान मिळाल आहे शहरातील मराठी शाळांमध्येच सेमीचा अभ्यास सुरू केलेला आहे त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या फ़ी .वाढीला व मनमानीला कंटाळलेल्या पालकांनी सुटकेच्या श्‍वास सोडला असून पालकांनी पाल्यास सेमीला प्रवेश दिल्याने इंग्लिश मिडियम वाल्यंाचे डोळे पांढरे पिवळे बनू लागले आहेत. इंग्लिश मिडियमच्या वाढत्या शाळंामुळे मराठी व ईतर भाषिक शाळा शेवटच्या घटका मोजू लागल्या होत्या. मराठी शाळा ओस पडणार .असे प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले कारण इंग्रजीच फ़ॅड डोक्यात शिरल्यामुळे मराठी शाळेतील शिक्षकंाना विदयार्थी देता विदयार्थी असे म्हणण्याची वेळ आली होती . एक विदयार्थी मिळविण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत होती कित्येक शाळेतील शिक्षक आता घरचा रस्ता भरावा लागणार / या भितीने नवीन व्यवसायाच्या शोधात होते काहीनी शाळा चालू  राहावी म्हणून विदयार्थाना स्कूल बस व खाऊची सोय स्वखर्चाने केली होती जुन महिन्याच्या अगोदर मे महिन्यापासून विदयार्थी शोधण्यासाठी शिक्षकांना ़फिल्डिंग लावावी लागत असे ़फिल्डिंग लावून सुध्दा ऐनवेळी षटकार मारणार्‍या पालकांमुळे अनेक मुलाची मराठी शाळेत येण्याची ईच्छा असूनही पालकांनी बळ जबरीनी इंग्रजी शाळेत घातल्याची अनेक उदाहरणे आहेत इंग्रजी माध्यामांच्या शाळेत प्रंचड विदयार्थी वाढू लागल्यामुळे मराठी शाळां बंद पडयाची भिती व्यक्त होत असतानाच आज मराठी शाळा दर्जेदार बनू लागल्याचे चित्र आहे इंग्रजी माध्यामांच्या शाळांमुळे विदयार्थी मिळत नसल्याने मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाणदेखील वाढले  होते त्यामुळे अनेक शिक्षण संघटनंानी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर निर्बध लादण्याची मागणी केंली होते. फ़ी वाढीच्या मुदयावर पालकांनी देखील इग्लिश मिडियमवाल्यंाना लक्ष्य केले होते अव्वाच्या सव्वा फ़ी उकळून प्रचंड माया जमविणार्‍या  या शिक्षण माफ़ीयांना या धोरणांमुळे चाप बसला आहे शासनाला उशिरा  का होईना शहानपण सुचल्याने सेमी इंग्रजी दुकानं बंद पडणार अशी अवस्था सध्या तरी  दिसू लागलेली आहे.
  एकीकडे सेमी इंग्रजी माध्यामांच्या शाळांना मोठया प्रमाणात परवानगी दिली जात असताना दुसरीकडे इंग्लिश मिडियमच्या शाळांवर निर्ंबध लादले जात आहेत आर टीईच्या माध्यमांतून इंग्रजी माध्यमांच्या शाळयात २५% प्रवेश मोफ़त करण्यासाठी प्रशासनाकडून कडक धोरण आणण्याची गरज आहे त्यामुळे प्रचंड माया कमविणार्‍या अल्पशिक्षित इंग्रजी शाळांच्या संस्थापकाचे धाबे दणाणले असून ते अडचणीत, अंधारात चाचपडत  असल्याचे चित्र आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages