विमानसेवा सुरू होण्यासाठी २७ जुलैला ४ तज्ञाची समिती पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 24, 2016

विमानसेवा सुरू होण्यासाठी २७ जुलैला ४ तज्ञाची समिती पाहणी

सोलापूर, (प्रतिनिधी)ः-  मुंबई सोलापूर आणि सोलापूर मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी भारतीय हवाई उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी सहमती दर्शवली असून सोलापूरच्या विमानतळाची पाहणी करण्यासाठी ४ तज्ञांची समिती बुधवार दि. २७ जुलै रोजी सोलापूरला येणार असल्याची माहिती खासदार ऍड शरद बनसोडे यांनी दिली.
सोलापूर विमानतळ सल्लागार समितीची बैठक नुकतीच झाली होती त्यावेळी या बैठकीमध्ये सोलापूर मुंबई विमानसेवा लवकरच सुरू व्हावे असा ठराव करण्यात आला होता त्याचवेळी केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री गजपती राजू यांना भेटून पत्र आणि निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने त्यांना हवाई वाहतुकीच्या प्रश्‍नासंबधी विचारणा झाल्यानंतर त्यांनी देशातील मेट्रो शहरापासून एक तपासाच्या अंतरावर असलेल्या शहरांना ३१ डिसेंबर २०१६ पर्यत विमान वाहतुकीने जोडण्यात येणार असून त्याचे भाडेही अडीच हजार एवढे राहणार आहे असे आश्‍वासन दिले होते. त्यावर त्यांची भेट घेऊन दिलेल्या पत्रासंबधी त्यांना आठवण करून दिले असता मंत्री महोदयांनी तातडीने सोलापूरच्या विमानतळाची पाहणी करण्यासाठी बुधवार दि. २७ जुलै रोजी चार जणांची एक समिती पाठवणार असल्याचे सांगितले भारतीय विमान वाहतुक विभातील तज्ञ या समितीमध्ये असणार आहेत विमानतळावरील सुविधा, विमानतळाची धावपट्टी तसेच भाडे आणि लोकांचा प्रतिसाद याबाबतचे तज्ञ या समितीमध्ये आहेत आणि ते संपूर्ण पाहणी करून माहिती घेऊन आपला अहवाल केंद्रीय विमान वाहतुक मंत्री  गजपती राजू यांच्याकउे सादर करणार आहेत. असे खा. शरद बनसोडे यांनी सांगितले. देशातील इतर लहान शहरामध्ये विमानतळाची चांगली सुविधा तयार करावी लागणार आहे परंतु सोलापूर शहरात अदयावत असे विमानतळ आहे यापुर्वी सोलापूर मुंबई आणि मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू होती गेल्या काही महिन्यापासून सोलापूरला विमानसेवा सुरू करण्यासाठी खाजगी कंपन्यांची विचारणा होत आहे परंतु त्यांचे प्रवासी दर सोलापूरकरांना परवडणारे नाही म्हणून एअर इंडियाकडून विमान वाहतुक सुरू केल्यास लोकांची सोय होऊ शकते असे केंद्रीयमंत्री गजपती राजू यांना सांगताच त्यांनी सोलापूरला विमानसेवा सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आणि चारजणांच्या समितीला व्यवस्थीत पाहणी करून अहवाल देण्याचा आदेश दिला आणि ३१ डिसेंबर २०१६ पुर्वीच सोलापूरला विमान वाहतुक सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्याचे खा. शरद बनसोडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages