राज्य व राष्ट्रीय पातळीवर कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण, संशोधन आदी क्षेत्रांत जीवनभर सामाजिक बांधिलकी मानून उल्लेखनीय कार्य
करणार्या व्यक्तीस सोलापूर विद्यापीठातर्फे हा पुरस्कार दिला जातो. रोख पंचवीस हजार रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. पवार यांना प्राप्त झालेले पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार - नवी दिल्ली, भैरूरतन दमाणी पुरस्कार-सोलापूर, शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार- कुर्डुवाडी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार- वाई, पद्मश्री विखे-पाटील साहित्य पुरस्कार- प्रवरानगर, मराठी साहित्य पुरस्कार- मुंबई, उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार, धोंडिराम माने साहित्यरत्न पुरस्कार- औरंगाबाद, शरद पुरस्कार- सोलापूर, स्व. लोकनेते यशवंतराव चव्हाण पुरस्कार- औरंगाबाद. जीवनगौरव पुरस्काराव्यतिरिक्त उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, गुणवंत विद्यापीठ कर्मचारी, गुणवंत विद्यापीठ शिक्षक, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, विद्यापीठ क्रीडा पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी, महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेतील विजेते, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान यावेळी पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेस परीक्षा नियंत्रक पी. बी. पाटील, कुलसचिव डॉ. देबेन्दनाथ मिश्रा, संचालक आर. वाय. पाटील, फायनान्स ऑफिसर शेवाळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment