
मुंबई (वृत्तसेवा)ः- रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालवणारे व मागे बसणार्या दोघांनाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. अन्यथा पेट्रोल दिले जाणार नाही, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधिमंडळात केले. रावते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते सुरक्षा समितीने मोटारवाहन कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेट घातले नसेल, तर पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नाही, असा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. हेल्मेट वापरण्यास दुचाकीस्वारांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारने हा नियम केला आहे. गेल्या महिन्यात तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचा आदेश दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता रावते यांनीही हेल्मेट असलेल्या दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याचा नियम केला. पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार आणि त्याचा सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट असेल, तरच त्याला पेट्रोल देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment