दहशतवाद हा दहशतवादच असतो. त्याला कोणताही धर्म नसतो. क्रूर दहशतवादी हे मानवतेचेच शत्रू आहेत, हेच फ्रान्समधील या भयानक क्रौर्याच्या घटनेने जगासमोर आले आहे. राष्ट्रीय दिनाच्या महोत्सवातील फटाक्यांची आतषबाजी पहाण्यासाठी फ्रेंच रेबेरॉ रेसॉर्टच्या परिसरात जमलेल्या हजारो स्त्री-पुरुष आणि बालकांना, पोलिसांनाही असे काही घडेल, असे वाटलेही नव्हते. पण, तसे घडले. या गर्दीत २५ मेट्रिक टन वजनाचा अवजड ट्रक अचानकपणे घुसला. गर्दीतील शेकडो लोक ट्रकच्या खाली चेंगरले गेले. पोलिसांनी ट्रक अडवायचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. दोन किलो मीटर अंतरापर्यंत या माथेफिरूने गर्दीतील निरपराध्यांच्या अंगावर ट्रक घालून क्रौर्याचा कळस गाठला. या घटनेत २०० च्या वर फ्रेंच नागरिक जबर जखमही झाले आहेत. निर्दयपणे अबालवृध्दांना चिरडणार्या मोहमंद लाहूएज बौहेल या ३१ वर्षे वयाच्या मूळ ट्यूनिशियन वंशाच्या फ्रेंच युवकाला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केल्यावरच हा ट्रक थांबला. अचानक कोसळलेल्या या संकटाने घाबरलेल्या-भेदरलेल्या लोकांनी सैरावैरा पळत जीव वाचवायचा केलेला प्रयत्नही यशस्वी झाला नाही. जास्तीत जास्त लोकांना ठार करण्यासाठीच या माथेफिरूने ट्रक गर्दीवर वेडावाकडा
चालवला आणि निर्दयपणे हे हत्याकांड घडवले. या घटनेने फ्रान्ससह युरोपवर शोककळा पसरली असतानाच इसिसच्या सैतानानी मात्र आनंदोत्सव साजरा करीत, या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला धर्मांध मुस्लीम दहशतवाद्यांनीच घडवल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी जाहीर करतानाच, आपल्या देशातील दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढली जातील, अशी ग्वाही देशवासीयांना दिली आहे. या भ्याड रानटी हल्ल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, युरोपियन राष्ट्रांचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र निषेध करत, जगातील इस्लामी दहशतवाद पूर्णपणे मोडून काढल्याशिवाय, जागतिक शांततेला आणि मानवतेला निर्माण झालेला भयंकर धोका संपणार नसल्याचा इशारा दिला आहे. दहशतवाद संपवण्यासाठी जगाने एकजूट केल्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिटंन यांनी दिला आहे. जिहादींच्या विरोधात जगानेच संयुक्तपणे लढा द्यायला हवा, असे आवाहन भारताने गेल्या २५ वर्षात वारंवार दिला होता. आता फ्रान्समधील या अतिभयंकर दहशतवादी हल्ल्याने इसिससह धर्मांध इस्लामी दहशतवादाचा धोका किती भीषण आहे, याची प्रचितीच पुन्हा एकदा जगाला आली आहे. फ्रान्समध्ये झालेला हा काही पहिलाच दहशतवादी आणि आत्मघातकी हल्ला नाही. गेल्या तीन वर्षात शार्ली हेब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेले हे सत्र थांबलेले नाही. आतापर्यंत दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात १३० लोकांचे बळी गेले आहेत.
Post Top Ad
Friday, July 22, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

No comments:
Post a Comment