गुणवंत विद्यार्थी व माळी समाजभूषण पुरस्काराचे थाटात वितरण
बार्शी (विशेष प्रतिनिधी)ः- महात्मा फुले प्रतिष्ठान, माळी समाज महासंघ व सावता परिषद बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला गुणवंत विद्यार्थी व माळी समाज भूषण पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक २४ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात बार्शी येथे करण्यात आले. यावेळी श्री नरहारी ढगे यांना (शेती व समाजकार्य) हा पुरस्कार बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच रविकिरण कोल्हे यांना (सनदी अधिकारी), रविंद्र माळी यांना (वैद्यकीय), कैशल्या माळी (राजकारण), प्रमोद माळी (क्रिडा क्षेत्र), धनाजी ननवरे यांना (कलाक्षेत्र), अशोक हराळे यांना (उद्योग), राजाभाऊ फुले यांना (सामाजिक कार्य), निलकंठ लिंगे यांना ( शिक्षण क्षेत्र), अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करणार्यांना माळी समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच बार्शी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ट्रॅपी प्रमाणपत्र व पुस्तक भेट देवून करण्यात आला. हा पुरस्कार देत असताना विद्यार्थ्यांमध्ये कमालिची उत्सुक्ता होती. व या कार्यक्रमामध्ये फक्त माळी समाजातील विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता तर संपूर्ण समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार दिलीप सोपल आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले की, सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार केला हे खूप अभिमानास्पद बाब आहे. व हाच खरा महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेला बहुजन समाज आहे. तसेच आपण वर्षानुवर्षे समाजाची जितकी सेवा करुन महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचे उपकार कधीच फेडू शकणार नाही. तसेच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या तीन संघटना व पदाधिकारी यांचे कौतुक करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आपल्या आई-वडिलांचे पांग फेडण्यासाठी चांगले शिक्षण घ्या व खूप मोठे व्हा असा आशिर्वाद देवून अध्यक्षीय भाषण संपवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.वासुदेव ढगे यांनी केले तर आभार सुरेश राऊत यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जि.प.सदस्य बाळासाहेब माळी हे होते. व विजयराव बोरवके, अनिल महाजन, विष्णू कांबळे, प्रभाकर माळी, मनोज जाधव, कल्याण आखाडे, गोविंद बादाडे, सोमनाथ वैद्य, विजय राऊत, दिनेश नाळे, सुरेश राऊत, ऍड.वासुदेव ढगे, नरसिंह भावनसे, अतुल शिंदे, यासह विद्यार्थी व पालकवर्ग माळी समाजबांधवासह इतरही समाजाचे नागरिक, विविध कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment