अक्कलकोट (प्रतिनिधी)ः- अक्कलकोट शहरात सोलापूर आयकर कार्यालय व रोटरी क्लब, अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात ‘अघोषित उत्पन्न’ यावर सोमवार दि. २५ जुलै रोजी सायंक ५ वा. सर्जेराव जाधव सभागृह, अक्कलकोट येथे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मृण्मय रामटेके (सहा. आयकर आयुक्त), उपेंद्र शिरशिकर (आयकर अधिकारी), चंद्रकांत केत (आयकर अधिकारी) हे मार्गदर्शन करणार आहेत. सोलापूर आयकर विभाग च्या उत्पन्न जाहीर योजना ही १ जून २०१६ रोजी कार्यान्वित झाली असून आयकर चुकविणे हा गुन्हा असून यापुढील काळात कडकपणे कायद्याची अंमलबजावणी होणार आहे.सरकारने जी अघोषित उत्पन्न स्वेच्छेने घोषित करण्यासाठी जी मुदत दिली आहे. यात जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा व पुढील कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर जे लोक विवरण भरत नाहीत त्यांनी ही ती भरावीत, असेही सुचविण्यात आले आहे. या योजनेद्वारे आपण आपले अघोषित उत्पन्न घोषित करू शकतो व या घोषित केलेल्या मालमत्ता संपत्ती अंतर्गत माङ्ग केली जाते असे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. तरी शहर व तालुक्यातील सर्व नागरिक बंधू,भगिनी,व्यापारी,व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष एजाज मुत्तवल्ली, सचिव जितेंद्रकुमार जाजू, कार्यक्रम प्रमुख सी.ए.ओंकारेश्वर उटगे, रोटरी क्लब,अक्कलकोट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment