या आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर आदी तीन प्रकारचे कोर्स चालविले जात होते. प्रत्येकी २१ विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश दिला जात होता. येत्या ऑगस्टपासून येथील सर्व कोर्स बंद केले जाणार आहेत त्यामुळे दरवर्षी ६३ आयटीआयधारक आता इथून तयार होणार नाहीत. फताटेवाडी येथे १२०० मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हा प्रकल्प मंजूर केला होता. एनटीपीसी व एनपीटीआय यांनी मिळून सन २०११-१२ साली कायमस्वरुपी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची देखील भरती केली होती. आता आयटीआय बंद होत असल्याने शिक्षकांना देखील काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. या ठिकाणी एकूण १२ कर्मचारी होते यातील ७ जण कायम होते.
याबाबत कर्मचार्यांनी विविध लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली; मात्र याकडे कुणीच लक्ष देत नसल्यामुळे हे आयटीआय केंद्र ऑगस्टपासून पूर्णपणे बंद होणार आहे. यापूर्वी इथे कार्यरत असणार्या सावन पाटणे आणि सनी लोधी यांना काढून टाकले आहे तर सावता महाजन, प्रणव साबळे, पुरुषोत्तम दोरशेटवार, गिरीश पटेल, रेवती गोटे यांना कामावरुन कमी करण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. आमचे पुनर्वसन करा अशी मागणी या कर्मचार्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment