आजपासून निरूपणकार विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

आजपासून निरूपणकार विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण

 आजपासून निरूपणकार विवेक घळसासी यांचे अ‍ॅम्फी थिएटरमध्ये निरूपण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   सुखी जीवनाच्या यात्रेसाठी हा प्रमुख आशय असलेल्या यंदाच्या विवेकाच्या अमृतवाणीमध्ये साधक, साधना आणि सिध्दी या तीन विषयावर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी आपले निरूपण करणार आहेत दिपावलीपूर्व पहाट प्रवचनमाला महाराष्ट्र साहित्र परिषद, शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन  क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30,31 ऑक्टोंबर आणि 1 नोव्हेंबर या तीन दिवशी लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी आयोजित करण्यात आल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे रांनी दिली.
शुक्रवार दि. 30 ऑक्टोंबर रोजी साधक, शनिवार दि. 31 ऑक्टोंबर रोजी साधना आणि रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सिध्दी या तीन दिवशी तीन विषयावर विवेकाची अमृतवाणी होणार आहे. गेल्या 16 वर्षापासून दिपावलीपूर्व वैचारिक दिपोत्सव अखंडपणे साजरा केला जातो. विविध विषयावर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या रसाळवाणीतून निरूपण केले जाते. दिवाळी पूर्वीची पहाट चांगल्रा विचाराने सुरू व्हावी दिवाळीची सुरूवात मंगलमर वातावरणात बौध्दिक मेजवानीने विवेकाच्या अमृतवाणीमधून केली जाते यासाठी पु. ना. गाडगीळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सुधा इडलीगृह, अ‍ॅटलान्स लाईफस्टाईल प्रा.लि., चंद्राम चव्हाण गुरूजी मागास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. विवेक घळसासी यांच्या  रसाळवाणीतून यापुर्वी प्रभु श्रीराम, महाबली हनुमान, श्रीकृष्ण, चाणक्य, रामायण, महाभारत यावर प्रवचन करण्यात आले.
 सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी विवेक घळसासी यांचे निरूपण वेळेवर सुरू होऊन वेळेवर सकाळी 7.30 वाजता संपणार आहे. तरी रा मंगलमय  बौध्दिक आणि वैचारीक मेजवानी असलेल्या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला मोठ्या संख्रेने उपस्थित राहावे,असे आवाहन मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्याकडून करण्रात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages