मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित - चैत्राली पाटेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित - चैत्राली पाटेकर

 मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित - चैत्राली पाटेकर

एसबीपीआयएम मध्ये चर्चासत्र संपन्न





पिंपरी, पुणे(कटूसत्य वृत्त):-   मानव संसाधन आणि मनुष्यबळ विकास हे क्षेत्र लोक आणि संस्कृतीशी संबंधित आहे. मानव संसाधन म्हणजे लोकांची काळजी घेणे. कोणतेही तंत्रज्ञान माणसांची जागा घेऊ शकत नाही, ते तुम्हाला फक्त डेटा देते. तंत्रज्ञान जीवन सुलभ करते, करिअर घडवण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे त्यासाठी स्वतःला अद्ययावत ठेवा असे मार्गदर्शन पीपल अँड कल्चर अडोर पावरट्रोन च्या प्रमुख चैत्राली पाटेकर यांनी केले. 
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे आयोजित केलेल्या 'आरंभ' या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी फोसेको हु्यूम रिसोर्स डायरेक्टर प्राची संचाल, एसबीपीआयएम संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर, ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ व आरोग्य संशोधक डॉ. वैजयंती पटवर्धन, जपानी भाषा संचालक डॉ. मानसी शिरगुरकर, शैक्षणिक प्रमुख रूपाली कुदरे आदी उपस्थित होते.
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
   प्राची संचाल यांनी सांगितले की, आधुनिक कौशल्य, वचन बद्धता आणि करुणा या त्रिसूत्रीचा जीवनात अंगीकार करावा. 
  डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी सांगितले की, महिलांचे अनेक सामाजिक प्रश्न आहेत. तसेच त्यांच्या मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक समस्या असतात. त्याचा व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संबंध येतो. प्रत्येक महिलेच्या सुखी जीवनाचा पाया निरोगी, निरामय आरोग्य आहे.       
     मानसी शिरगुरकर यांनी सांगितले की, जपानमध्ये नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल तर जपानी भाषा, संस्कृती आणि जपानी ब्रँड बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तुम्हाला त्यांची भाषा समजून घ्यावी लागते.
  सूत्रसंचालन डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन आणि आभार डॉ. योगेंद्र देवकर यांनी मानले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages