जगातील प्रत्येक जीव साधक आहे - निरूपणकार विवेक घळसासी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 30, 2026

जगातील प्रत्येक जीव साधक आहे - निरूपणकार विवेक घळसासी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे - निरूपणकार विवेक घळसासी
तीन दिवसीय विवेकाच्या अमृतवाणीला अ‍ॅम्फी थिएटरमध्ये प्रारंभ



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  जगाच्या पाठीवरील प्रत्येक जीव साधक आहे. प्रत्येकाला काहीतरी मिळवायचे आहे. म्हणून तो साधक होतो असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30,31 ऑक्टोंबर आणि 1 नोव्हेंबर 2026 या तीन दिवशीय दिपावलीपूर्व विवेकाची अमृतवाणीचे अ‍ॅम्फी थिएटर मध्ये आयोजन करण्यात आले त्यामध्ये पहिल्या दिवशी साधक या विषयावर त्यांनी निरूपणातील पहिले पुष्प गुंफले.

  अखंड नामस्मरणाने भगवंताचे दर्शन घडते. काहीतरी वेगळे साधण्याची तीव्र इच्छा असलेला साधक आहे. शांती समाधान साधायचे असेल तर स्वतः शिवाय कोणी नाही. भगवंताने या पृथ्वीतलावर आपल्या पाठवताना काय साधायचे आहे हे आपण कधी पाहात नाही. म्हणून सजग साधक व्हायचे आहे. भोगापासून योगा पर्यत नेणाराच साधक असतो. माणूस स्वतःशी जेव्हा बोलतो तेव्हा तो खरे बोलतो पण इतरांशी बोलताना मात्र तो कधी कधीच खरं बोलतो. अवगुणाचा त्याग करता आलं पाहिजे. असेही निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी सांगितले.
प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी आणि सुधा इडली गृहचे मालक सिध्देश्‍वर किणगी यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार घालून प्रारंभ करण्यात आले. सुखी जीवनाच्या यात्रेसाठी या प्रमुख विषयावर यावर्षीचे निरूपण सुरू असून यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. गेल्या 16 वर्षापासून विविध विषयावर अखंडपणे ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे विवेकाची अमृतवाणी सोलापूरकरांसाठी दिवाळीपूर्व विचारांची मेजवाणी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्तविद्यमाने  पु ना  गाडगीळ प्रायोजित आणि सहप्रायोजक सुधा इडली गृह , ऍटलांस यांच्या  सहकार्याने  आयोजित करण्यात येते त्याला रसिक श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाच्या वर्षीच्या पहिल्याच दिवशी सकाळी 6 वाजताच श्रोत्यांनी अ‍ॅम्फी थिएटर भरून गेले होते. शनिवार दि. 31 ऑक्टोंबर 2026 रोजी दुसरा दिवस असून साधना या विषयावर निरूपण होणार आहे. यावेळी प्रशांत बडवे, अविनाश महागांवकर, जितेश कुलकर्णी, विनायक होटकर, शहाजी पवार, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, गुरूशांत धुत्तरगांवकर, विशाल शिंदे, बंकापुरे, जितेंद्र जोशी आदींसह सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यातील रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages