एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे कौशल्य बोध विकास मेळावा संपन्न
पिंपरी, पुणे(कटूसत्य वृत्त):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ कौशल्य शिक्षण विभाग च्या वतीने कौशल्य बोध क्षमता विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल च्या वृंदा मुलतानी जोशी, ब्लूमिंग डेल इंटरनॅशनल स्कूल चे डॉ. हितेश शर्मा, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल च्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी व शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई स्वभाव ही शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात पुण्यातील विविध शाळांमधील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ आदींनी सहभाग घेतला होता. यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
कौशल बोध या अभ्यासक्रमाची संकल्पना स्पष्ट करताना कृती आधारित व अनुभव आधारित शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
या कौशल्य मेळाव्यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी कार्य करणे, यंत्रे व साहित्याचा वापर आणि मानवी सेवा अशा विविध विषयांवर आधारित प्रकल्प व प्रात्यक्षिके सादर केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, व्यावहारिक कौशल्ये, सहकार्य भावना आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांची मांडणी करण्यात आली.
मेळाव्याच्या आयोजनात विभाग समन्वयक वंदना सांगळे, प्रशासकीय व्यवस्थापक डॉ. मनीष ढेकळे, कौशल प्रयोगशाळेच्या प्रमुख वर्षा देशमुख यांनी सहभाग घेतला.


No comments:
Post a Comment