जिल्हा बँकेच्या रणांगणात दिग्गजांची उडी
देशमुख, पाटील, माने, जगताप, म्हेत्रे, शिंदे यांचे अर्ज दाखल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत ५१६ अर्जांची विक्री झाली असून आतापर्यंत ६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.आज ५४ उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख व त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख, आमदार राजेंद्र राऊतांचे चिरंजीव रणवीर राऊत, माजी आमदार राजन पाटील व त्यांचे चिरंजीव विक्रांत (बाळराजे) आणि अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार दिलीप माने आणि त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज, माजी आमदार जयवंतराव जगताप व त्यांचे चिरंजीव शंभूराजे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे या प्रमुखांचा अर्ज दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील यांनी ओबीसी आणि पणन संस्था मतदारसंघातून अर्ज भरला आहे. माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी चार मतदारसंघातून अर्ज भरला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (शुक्रवारी, ता. ३० ऑक्टोबर) शेवटचा दिवस असून दुपारी तीनपर्यंत अर्ज भरण्याची वेळ आहे. शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अर्जांची छाननी सोमवारी (ता. २ नोव्हेंबर) होणार आहे. या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी माजी संचालक काय करणार? या बद्दल कमालीची उत्सुकता आहे. या माजी संचालकांना निवडणूक लढविण्यासाठी तिहेरी अडथळे आहेत. यातून ते कसा व काय मार्ग काढणार?, कोणते माजी संचालक थांबणार आणि कोण निवडणूक लढणार? याबद्दल जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाला मोठी उत्सुकता आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट सोसायटी मतदारसंघातून, तर आमदार सुभाष देशमुख यांनी नागरी बँका, पतसंस्था मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आतापर्यंत ५१६ अर्जांची विक्री झाली असून आतापर्यंत ६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवारी (ता. २ नोव्हेंबर) होणार आहे. या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे
सोसायटी मतदारसंघ : १७
सचिन कल्याणशेट्टी (दोन अर्ज), विश्वेश्वर नागूर, रणवीर राऊत (दोन अर्ज), रणजित शिंदे (दोन अर्ज), बबन आवताडे, सिध्देश्वर आवताडे, राजन पाटील, विक्रांत पाटील, कल्याण काळे, पोपट गडदे, दिलीप माने, पृथ्वीराज माने, भारती शिवदारे (दोन अर्ज).
महिला प्रतिनिधी मतदारसंघ : ७
अस्मिता गडदे, मंदाकिनी गडदे, श्रृष्टी टिक्के, नीलाबाई काटकर, सविता गायकवाड, सिंधू पाटील, रोहिणी तडवळकर.
अनुसुचित जाती/जमाती मतदारसंघ : २
सत्यवान कांबळे, शंकर गायकवाड.
इतर मागासवर्गीय मतदारसंघ : ४
अजिंक्यराणा पाटील, नागनाथ कदम, सिद्धाराम म्हेत्रे, जमीर सुतार.
विमुक्त जाती/भटक्या जमाती : ३
युवराज राठोड, पोपट गडदे, राहुल घुटुकडे.
पणन संस्था : ३
अजिंक्यराणा पाटील, रणजित शिंदे दोन अर्ज
दुग्ध संस्था : २
रणजित शिंदे दोन अर्ज.
नागरी बँका : १६
सिध्देश्वर आवताडे, अजिंक्यराणा पाटील, मनीष देशमुख, सुभाष देशमुख, प्रकाश पाटील, अस्मिता गायकवाड, कल्याण काळे, भीमाशंकर जमादार, सिध्दाराम चाकोते, रणजित शिंदे दोन अर्ज, अमोल शिंदे, रोहिणी तडवळकर, शहाजी पवार दोन अर्ज, राजेंद्र गंगदे, कन्हैयालाल देवी.

No comments:
Post a Comment