प्रचारार्थ खा धैर्यशील मोहिते-पाटील यांची फॅबटेक टेक्निकल कॅम्पसला भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 22, 2026

प्रचारार्थ खा धैर्यशील मोहिते-पाटील यांची फॅबटेक टेक्निकल कॅम्पसला भेट

 प्रचारार्थ खा धैर्यशील मोहिते-पाटील यांची फॅबटेक टेक्निकल कॅम्पसला भेट





सांगोला (कटूसत्य वृत्त):- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगोला तालुक्यातील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रा. भाऊसाहेब रुपनवर यांची भेट घेऊन महाविद्यालयातील शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधला.
शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांवर सक्षमपणे काम करण्याचे आश्वासन
या संवादादरम्यान शिक्षण क्षेत्रासमोरील विविध प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी तसेच पदवीधरांच्या अपेक्षांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना सक्षमपणे न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार कटिबद्ध असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शिक्षक व पदवीधर मतदारांना केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, पदवीधर मतदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages