शेतकऱ्यांच्या वीज समस्यांवर इंद्रजित पवार यांची महावितरणकडे धाव
उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर उपसा सिंचन योजनेचा पंप नियमित वीजपुरवठ्याअभावी बंद असल्याने तालुक्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा पंप तातडीने सुरू करण्यासाठी नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्याकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी करण्यात आली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध वीज समस्यांबाबत महावितरण कार्यालयात सुनील माने यांची भेट घेऊन निवेदन करण्यात आले. शिरापूर उपसा सिंचनाचा पंप तातडीने कार्यान्वित झाल्यास तालुक्यातील पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
याशिवाय, जळालेला डीपी बदलल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत पुन्हा जळत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, शेतकऱ्यांना दिवसा आठ तास नियमित वीजपुरवठा करावा, आवश्यक ठिकाणी नवीन डीपी उपलब्ध करून द्यावेत आणि वीज समस्या तातडीने सोडविण्यासाठी निवासी वायरमनची नियुक्ती करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवून नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अरुण बारसकर, विनायक सुतार, जिल्हाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, अमोल साठे, शंकर साठे, महादेव कदम आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment