नालेसफाई भ्रष्टाचार प्रकरणी नगरसेवक अनंत जाधव यांचे नाराजी पत्र
महापालिका आयुक्तांच्या कारभाराची तक्रार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नालेसफाईत झालेला भ्रष्टाचार उघड झाला असतानाही महापालिका आयुक्त सचिन ओंबासे हे कारवाई करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने भाजप नगरसेवक अनंत जाधव यांनी आयुक्तांना नाराजी पत्र दिले असून याप्रकरणी पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.
नालेसफाई प्रकरणी तक्रार आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती घटित केली होती. त्या चौकशी समितीने अहवाल देऊन १९ अधिकारी/कर्मचारी व मक्तेदार हे आर्थिक नुकसानीस व बेजबाबदारपणा केल्याचे स्पष्टपणे अहवालात नमूद केले होते. अशा सर्वांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस दिली त्यानुसात तात्काळ कार्यवाही अपेक्षित आहे. पण महापालिका प्रशासनाकडून असे काही होताना दिसत नाही. त्यामुळे आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान अनंत जाधव यांनी आपल्या पत्रामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करताना आपण पत्राचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन नगर अभियंता सारिका अकोलवार, प्रभारी वरिष्ठ फोरमन गिरीश पुकाळे या मुख्य दोन अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ करावे आणि नालेसफाई प्रकरणात झालेले महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान संबंधितांकडून वसूल करावे.अन्यथा आपण प्रकरणी अधिकाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न असल्याचे दिसून येते. कारवाई न झाल्यास याबाबत मला नाईलाजास्तव जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे दाद मागावी लागेल याची गांभिर्याने नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे.
.png)
No comments:
Post a Comment