दक्षता जनजागृतीतून पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त समाजामध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती दक्षिण सोलापूर व उप उपविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.
गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर वाचन करून दाखविले.
या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, मनिषा वास्ते विस्तार अधिकारी श्रीमती मृणालिनी शिंदे, ज्योतीराम भोसले, सुरेश राठोड, शिवानंद सोलापूरे संदीप घोडके, शहानवाज शेख, श्रीमती सुरेखा तोंडसे, रूपाली मोरे, स्नेहा जाधव, अजीज सय्यद, श्रीकांत माने, जिलानी अंसारी, शिवानंद नागूर, गजेंद्र कुमठेकर, मिलन बिराजदार, विनायक कुंचपोर, सुधीर फुलारी, भिमाशंकर कोळी, श्रीमती अरुणा रांजणे, कैलास शिंदे, पंडित होनमाने, कंत्राटी कर्मचारी श्रीमती अश्विनी बिराजदार, दिपाली धेंडे, आरती महिंद्रकर, गौरी तुपे व युवराज यादव उपस्थित होते.

No comments:
Post a Comment