श्री भगवती गौरीमाता प्रशालेत आकाशकंदील व ग्रीटिंग कार्ड निर्मिती उपक्रम उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 29, 2026

श्री भगवती गौरीमाता प्रशालेत आकाशकंदील व ग्रीटिंग कार्ड निर्मिती उपक्रम उत्साहात

श्री भगवती गौरीमाता प्रशालेत आकाशकंदील व ग्रीटिंग कार्ड निर्मिती उपक्रम उत्साहात





धोत्री (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशालेत दिवाळीच्या निमित्ताने आकाशकंदील व ग्रीटिंग कार्ड बनविण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि हस्तकलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आकाशकंदील निर्मिती स्पर्धेत लहान व मोठ्या गटांतील एकूण १५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर ग्रीटिंग कार्ड निर्मिती स्पर्धेत ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध रंग, आकर्षक सजावट आणि कल्पकतेचा वापर करून सुंदर आकाशकंदील व ग्रीटिंग कार्ड तयार केली.
या स्पर्धा मुख्याध्यापक गिरमल बुगडे,  पर्यवेक्षक परमेश्वर मेरु व संजय पाटू यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. परीक्षक म्हणून चंद्रकांत स्वामी व मल्लिकार्जुन गुरव यांनी काम पाहिले.
 *आकाशकंदील निर्मिती स्पर्धेचा निकाल* 
लहान गट :
प्रथम : श्रुती स्वामी
द्वितीय : आदित्य दहिटणे
तृतीय : शाश्वत पाटील
उत्तेजनार्थ : श्रेयश तोळणूर व संकेत चौगुले
मोठा गट :
प्रथम : विजय शिरसेडकर
द्वितीय : अजय शिरसेडकर व नागराज बिराजदार
तृतीय : आकाश डमढेरे
उत्तेजनार्थ : भीमाशंकर चौगुले
 *ग्रीटिंग कार्ड निर्मिती स्पर्धेचा निकाल* 
प्रथम : मीनाक्षी सावंत्रे
द्वितीय : सृष्टी कोळी
तृतीय : वैष्णवी चौगुले
उत्तेजनार्थ : स्नेहा मठ
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक कलाकृती साकारण्याची संधी मिळाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळून त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि स्वनिर्मितीचा आनंद मिळाल्याचे मुख्याध्यापक बुगडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages